उपमुख्यमंत्र्यांची ‘फेसबुक’वर बदनामी करणाऱ्या 15 जणांना अटक

86

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर फेसबुक अकाउंटवरून आक्षेपार्ह आणि बदनामीकारक शिवीगाळ, कमेंट करणाऱ्या पंधरा जणांची वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन वडगाव पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 294, 500,501, 504,505 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली असून या 15 जणांना अटक करण्यात आली आहे.

बदनामी करणारे 15 जण अटकेत

याप्रकरणी नितीन संजय यादव, वय.३० वर्षे (रा.करंजेपूल, ता.बारामती, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली असून यामध्ये संशयित आरोपी सतीश वर्तक, विश्वजित इंद्रदेव पोटफाडे, विपुल भोंगळे, विनोद पवार, विजय भोगे, रणजित राठोड, सचिनभैय्या तिपटे पाटील, शंतनू घैवट, प्रसन्न निजामपूरकर, ओंकार देवरकगावकर, आशुतोष भिताडे, हरीष शेटे, कुणाल महाडीक, गणेश चोरमारे, अभिजित देशमुख असे गुन्हा दाखल केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

(हेही वाचा – फडणवीसांची ‘समृ्द्धी’ आता ठाकरेंना झाली प्यारी)

काय आहे प्रकरण?

काश्मिरी पंडितांच्या जीवनावर बेतलेला ‘द कश्मिर फाईल्स’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त केला जाणार नाही, केंद्र सरकारने सवलत दिल्यास सर्व राज्यांनाही ती लागू होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत म्हणाले होते. त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून अजित पवारांवर टीका करण्यात आली होती. संबंधित फेसबुक युजर्सनी अजित पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. शिवाय शिवीगाळ करणाऱ्या कमेंट्स केल्या होता. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नितीन यादव यांनी 15 फेसबुक युजर्सविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्या तक्रारीवरुन वडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.