‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला तेव्हापासून या चित्रपटाबाबत चर्चा सुरू आहेत. दरम्यान, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात 100 कोटींहून अधिकच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यांवर घेतले असले तरी यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील विस्थापित हिंदू आणि काश्मिरी पंडितांच्या भावना दुखावल्या गेल्याने पुन्हा ती वेदना जाणवत आहे. अशा स्थितीत दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे विधान आणि त्यानंतर सर्वांनी उडवलेली खिल्ली, यामुळे विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या हृदयावर खोलवर आघात झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी इतके असंवेदनशील होऊ नये, असे काश्मिरींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या दिलीप भान नावाच्या नेत्याने सांगितले.
26 मार्च 2022 रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली विधानसभेत ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करण्याच्या भाजपच्या मागणीला उत्तर देत होते. यामध्ये त्यांनी केवळ चित्रपटाबाबतच नाही तर काश्मीरमध्ये घडलेल्या घटनांवरही भाष्य केले. या शेरेबाजीत ते आणि त्यांचे सहकारीही मोठ्याने हसताना दिसले. जे व्हायरल झाले आहे. जम्मू-काश्मीरच्या सामान्य जनतेला याचे वाईट वाटले.
काँग्रेसचे काय झाले? हळूहळू ती जशी संपत चालली आहे, तसेच पुढच्या चार-पाच वर्षांत यांचे होणार आहे. कोणीही इतके असंवेदनशील असू नये. ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असे असंवेदनशीलपणे हसू नये. माझी इच्छा आहे की, काश्मीरमध्ये आम्ही जे भोगले, आमच्यासोबत जे घडले ते केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत घडो.
– दिलीप भान, संयोजक, गव्हर्नमेंट स्कूल टीचर्स असोशिएशन
हे एक ना एक दिवस नक्कीच रडतील – अशोक पंडित
दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांच्या हसण्यावर चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अशोक पंडित यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आमच्या मृतदेहांवर हसणारे हे लोक एक ना एक दिवस नक्कीच रडतील. ज्याप्रमाणे गोळ्या झेलतांना काश्मिरी हिंदू जीवाच्या आकांताने रडत होता.
हमारी लाशों पर हंसने वाले यह चेहरे एक ना एक दिन ज़रूर चीख चीख कर रोएँगे ! ठीक उसी तरह जिस तरह गोलियाँ खाते वक्त एक कश्मीरी हिंदू चीखा था!
इनकी हंसी यह दर्शाती है कि इनके भी हाथ खून से रंगे हुए हैं क्यूँकि यह यह आतंकवादियों के साथ हैं!#AntiHinduKejriwal #AntiNationalKejriwal pic.twitter.com/fYkO6pAmKQ— Ashoke Pandit (@ashokepandit) March 27, 2022
अशोक पंडित यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, त्यांची दिवंगत आई निर्मला पंडित 1993 मध्ये पहिल्या जागतिक काश्मिरी पंडित परिषदेला संबोधित करत आहेत. आम्ही आमची लढाई सन्मानाने लढत आलो आणि अजूनही लढत आहोत. आपली अस्मिता जपण्याचा आमचा लढा अजूनही सुरू आहे.
Late Maa Nirmala Pandit (My mother ) addressing the community at the 1st World #KashmiriPanditsConference organised by #PanunKashmir in the year 1993 at Delhi .
We have fought our battle with lots of dignity & are still doing so.
The fight to save our identity still continues. pic.twitter.com/6bYD1olros— Ashoke Pandit (@ashokepandit) March 29, 2022
आज आमची अवस्था द्रौपदीसारखी झाली आहे, तिचे वस्त्रहरण होत असताना ती सर्वांकडे पाहत होती, कोणीतरी तिची लाज वाचवावी. तसेच आजपर्यंत आम्ही प्रत्येकाचा दरवाजा ठोठावला, अगदी आमच्या सरकारने पण आम्हाला साथ दिली नाही. कारण ज्या प्रकारे द्रौपदीला त्यावेळी पाठींबा दिला नव्हता, त्याचप्रमाणे आज आमचे सरकार गहाण आहे ते मतांसाठी असून खुर्च्यांसाठी आहे. ते आम्हाला कशी साथ देईल? , असाही सवाल त्यांनी त्यावेळी उपस्थित केला होता.
Join Our WhatsApp Community