श्री सिध्दी विनायकायला अर्पण केलेल्या सोने जवाहिऱ्यांचा लिलाव करण्यात येत असून येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी श्री सिध्दीविनायक मंदिरात हा लिलाव होणार आहे. त्यामुळे बाप्पाला अर्पण केलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीची सुवर्णसंधी भाविकांना मिळणार आहे. गणपती बाप्पाचे दागिने आता जास्त बोली लावून भक्तांना घेता येता येणार असून एकप्रकारे गुढीपाडव्यांची भेटच यामाध्यमातून घरी नेता येणार आहे.
( हेही वाचा : कलम ३७० हटवल्यावर काश्मिरात किती जणांनी खरेदी केल्या जमिनी? )
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लिलाव
श्री चरणी अर्पण केलेल्या श्री गणेश प्रतिमा, लॉकेट्स, मोदक, सोनसाखळ्या, हार आदी सोन्याच्या अलंकाराच्या जाहीर लिलाव गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५च्या कालावधीत मंदिराच्या परिसरात आयोजित करण्यात आला आहे. लिलावासाठी उपलब्ध असलेले दागिने लिलावाच्या दिवशी मंदिराच्या आवारात प्रदर्शनात ठेवण्यात येतील व पुढील प्रक्रिया शासनाच्या नियमानुसार केली जाईल असे श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासाचे कार्यकारी अधिकारी नंदा राऊत यांनी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. लिलावासंबंधीचे सर्व अधिकार न्यासाने राखून ठेवलेले आहेत, श्री सिध्दीविनायकाच्यसा सर्व भक्तांनी या लिलावात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन न्यास व्यवस्थापन समितीने केले आहे.
Join Our WhatsApp Community