औरंगाबादमध्ये कुरियरने एकाचवेळी तब्बल ३७ तलवारी मागवण्यात आल्या होत्या परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळीच उघडीस आला. या प्रकारामुळे संपूर्ण औरंगाबाद शहर हादरून गेले आहे. ३७ तलवारी एकाचवेळी कोणी व का मागवल्या असतील याचा शोध सध्या औरंगाबाद पोलीस घेत आहेत.
( हेही वाचा : आता विद्युत वेगाने धावणार कोकण रेल्वे! )
एक कुकरी आणि ३७ तलवारी
शहरात कुरियरने तलवारी आल्याची गुप्त माहिती सहायक पोलिस आयुक्त (शहर विभाग) अशोक थोरात यांना हेरामार्फत मिळाली होती. माहिती मिळाल्यावर थोरात यांनी तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश क्रांती चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांना दिले. यानुसार दराडे यांच्या पथकाने निराला बाजारातील डीटीडीसी कुरियरच्या कार्यालयावर छापा टाकला. कुरियरची तपासणी केल्यावर पार्सल बॉक्समध्ये पोलिसांना एक कुकरी आणि ३७ तलवारी आढळून आल्या. या तलवारी पोलिसांना जप्त केल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या संदर्भात सखोल तपास करत आहेत.
पोलीस तपास सुरू
या ३७ तलवारी ७ वेगवेगळ्या पत्यावर मागवण्यात आल्या होत्या. यातील पाच पत्ते औरंगाबाद आणि दोन जालन्याचे आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community