मुंबईत चक्क १ लाख ६२ हजार ७२४ शौचालयांच्या मलटाक्या, पण साफसफाईचे मिशन शून्य

110

कांदिवलीतील सार्वजनिक शौचालयाच्या टाक्याची साफसफाई यांत्रिक वाहनाद्वारे न करता मनुष्याद्वारे करण्यात आल्याने यामध्ये झालेल्या अपघातात एक कामगारांचा मृत्यू झाला होता. यानंतर मुंबईतील शौचालयांच्या तुंबलेल्या टाक्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून वर्षांतून दोन वेळा टाक्यांची साफसफाई करणे आवश्यक असतानाही महापालिकेकडे असलेल्या अपुऱ्या स्लड्ज डिवॉटरींग वाहनांमुळे या टाक्यांची साफसफाई ही वर्षानुवर्षे केली जात नाही. त्यामुळे आजही अनेक सार्वजनिक शौचालयांची मलकुंडे ही गॅसची चेंबर बनत चालली आहे.

( हेही वाचा : पगार वाढणार! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याची भेट )

मुंबईतील अनेक शौचालयांच्या टाक्या वर्षांतून दोन वेळा साफ करणे आवश्यक असून अशाप्रकारे साफसफाईच होत नसल्याने अनेक शौचालयांनी धोक्याची पातळी ओलांडल्याचे पहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या मलनि:सारण विभागाने सन २०१६-१७ सार्वजनिक शौचालयांच्या टाक्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये १ लाख ६२ हजार ७२४ मलटाक्या आढळून आल्या आहे.

मुंबईतील सर्व मलटाक्यांचा आढावा

मुंबईत सध्या २२ हजार शौचकुपांची बांधणी केली जात आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण शौचकुपांची संख्या १ लाख ४८ हजार २२४ एवढी झाली आहे. ज्या परिसरांमध्ये मलवाहिनी वाहिन्यांचे नेटवर्क उपलब्ध नाही, अशा परिसरांमध्ये शौचालयांची जोडणी सांडपाण्याच्या टाक्यांना करण्यात आली आहे. शौचालयांच्या वाढत्या संख्येने बांधण्यात आल्या आहेत. या टाक्यांच्या साफसफाईकरता महापालिकेच्यावतीने मलनि:सारण वाहने पुरवण्यात येतात. यातील बऱ्याच मलटाक्या या दाटीवाटीने वसलेल्या अस्ताव्यस्त लोकवस्त्यांमध्ये बांधण्यातत आल्या असून त्याठिकाणी महापालिकेकडे उपलब्ध असलेली वाहनसामुग्री पोहचू शकत नाही. त्यामुळे प्रचलित कायद्यानुसार मलटाक्या साफ करण्याकरता मनुष्यबळाच्या वापरास प्रतिबंध असल्यामुळे या मलटाक्यांची साफसफाई करणे जिकरीचे जात असल्याचे असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील कांदिवलीतील सार्वजनिक शौचालयांमधील मलटाक्या साफ करताना झालेल्या दुघर्टनेनंतर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने मुंबईतील सर्व मलटाक्यांचा आढावा घेत अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार त्यांचा अहवाल तयार होत असून लवकरच यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

सर्वेक्षणात आढळून आलेल्या मलटाक्या

शहर विभाग : ३३२४

पश्चिम उपनगरे : १,१५,०२४४

पूर्व उपनगरे :४४,३७६

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.