आयटीआर भरण्याचा शेवटचा दिवस; नाहीतर होऊ शकतो तुरुंगवासही

101

२०२०-२०२१ या वित्त वर्षाचे प्राप्तिकर विवरणपत्र (Income Tax Return) भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च आहे. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे आयटीआर भरण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारीवरून ३१ मार्च करण्यात आली होती. या मुदतीत विवरणपत्र दाखल न केल्यास करदात्यास मोठा दंड भरावा लागू शकतो. याशिवाय करदात्याला ३ ते ७ वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.

( हेही वाचा : कोळशाच्या टंचाईमुळे आता नागरिकांना बसणार शाॅक! )

मुदतीत प्राप्तिकर विवरणपत्र भरणे बंधनकारक

शेवटच्या तारखेपर्यंत आयटीआर दाखल न केल्यास, अघोषित संपत्तीसाठी करदात्याला नोटीस दिली जाऊ शकते. नोटीस मिळाल्यास करदात्याला दुहेरी फटका बसून दंड आणि व्याजही भरावे लागते. याशिवाय करदात्याकडे कर थकलेला असेल तर तुरूंवासाची शिक्षाही होऊ शकते. मुदतीनंतर आयटीआर भरल्यास विलंब शुल्क सुद्धा भरावे लागेल. सध्याच्या आयकर नियमांनुसार कमीत कमी 3 वर्षे कारावास आणि कमाल 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते. आयकर कायद्याच्या कलम २३४ अंतर्गत आयकर विवरणपत्र न भरल्यास पाच हजारचा दंड आहे. तुमचे एकूण उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी असल्यास, तुम्हाला फक्त हजार रुपये भरावे लागतील. हा नियम सर्व करदात्यांना लागू होतो.

  • सुधारित आयटीआर दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे.
  • सुधारित आयटीआर दाखल केल्यास दंड किंवा विलंब शुल्क भरावा लागणार नाही.
  • पहिल्या आयटीआरमधील चुकीमुळे कर देयता वाढली असेल तर प्राप्तिकर कायद्याच्या कलम २३४ अन्वये व्याज भरावे लागेल.
  • मुदतीच्या आधी आयटीआरमध्ये कितीही वेळा सुधारणा करता येते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.