उत्तराखंडमधील एका मोठ्या कारवाईत पुष्पांजली रियल्म्स आणि इन्फ्राटेक लिमिटेड कंपनीचे संचालक राजपाल वालिया यांच्या पत्नीची 31.15 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत बहुतांशी स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. ईडीने फसवणुकीच्या एका प्रकरणात ही कारवाई केली आहे. पीएमएलए कायदा 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने जुलै 2020 मध्ये डेहराडूनमधील राजापूर पोलीस ठाण्यात कंपनी, तिचे संचालक आणि इतरांविरुद्ध आयपीसीच्या अनेक कलमांतर्गत फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.
सदनिकाधारकांची केली फसवणूक
मिळालेल्या माहितीनुसार, फ्लॅटधारकांच्या तक्रारीनंतर फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आले. तपासादरम्यान असे आढळून आले की कंपनीने फ्लॅटधारकांची आगाऊ बुकिंग रक्कम स्वत:साठी वापरली या रकमेचा वापर स्वत:च्या आणि कुटुंबाच्या नावे मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला.
( हेही वाचा: कुरबुरी कायम! आता शिवसेना राष्ट्रवादीवर नाराज )
31.15 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त
सध्या या प्रकरणात कंपनीच्या भूखंडाच्या रूपात 31.15 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेसह वालिया यांचे निवासस्थान आणि एक फ्लॅटही जप्त करण्यात आला आहे. हा फ्लॅट त्यांच्या पत्नीच्या नावावर होता. पीएमएलए कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
Join Our WhatsApp Community