पेट्रोल आणि डीझेलच्या वाढत्या दरामुळे त्याचा परिणाम उबेर टॅक्सीवर झाला आहे. अॅप बेस्ड कॅब सर्व्हिस देणाऱ्या उबेरने त्यांच्या भाड्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ 15 टक्के होणार आहे. गेल्या 11 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 6.40 रुपये प्रति लिटर वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
इंधन दरवाढ चिंतेची बाब
उबेर इंडिया आणि साऊथ आशियाचे सेंट्रल ऑपरेशन्सचे प्रमुख नितेश भूषण म्हणाले, उबरने मुंबईत आपल्या दरात 15 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सेवा दरात वाढणाऱ्या दराचा फायदा चालकांना होणार आहे. ड्रायव्हरकडून येणाऱ्या प्रतिक्रियेवरून इंधनदरात होणारी वाढ हा चिंतेचा विषय आहे. देशात 22 मार्च 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. 22 मार्च ते 23 मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेल प्रतिदिन 80 ते 80 पैशांनी महागले. 24 मार्च रोजी कोणताही बदल झाला नाही, मात्र 25 मार्चपासून पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल 26 पर्यंत 80-80 पैशांनी वाढलं. यानंतर 27 मार्च रोजी पेट्रोल 50 पैसे तर डिझेल 55 पैसे महागले. 28 मार्च रोजी पेट्रोल 30 पैशांनी तर डिझेल 35 पैशांनी वाढले. 29 मार्च रोजी पेट्रोल 80 पैशांनी आणि डिझेल 70 पैशांनी वाढले, 30 मार्चला पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांनी वाढ झाली आणि 31 मार्चला पेट्रोल आणि डिझेलचे दर 80 पैशांनी वाढले. तर 1 एप्रिल रोजी कोणताही बदल झाला नाही.
(हेही वाचा मेट्रोच्या लोकार्पणाआधीच भाजप-शिवसेनेत श्रेयवादावरून जुंपली)
Join Our WhatsApp Community