गेल्या आठवड्यापासून इंधन दरवाढ होत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कच्च्या तेलाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे भारतातील पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. ही दरवाढ सुरुच आहे. बारा दिवसातील ही दहावी दरवाढ आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी एक दिवस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा इंधन दरवाढ केली आहे. सर्वात अधिक दरवाढ मुंबईत झाली आहे.
कोणत्या राज्यात किती दरवाढ?
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर देशभरात पेट्रोल ८० पैसे आणि डिझेल ८५ पैशांनी महागले. पेट्रोलियम कंपन्यांनी २२ मार्चपासून इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. या दरम्यान पेट्रोल आणि डिझेल ७ रुपये २० पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोल ८५ पैशांनी महागले आहे. या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११७.५७ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०२.६१ रुपये झाला आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ११२.१९ रुपये इतका वाढला आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०८.२१ रुपये इतका झाला आहे. मुंबईत डिझेल दरांनी शंभरी ओलांडली आहे. एक लीटर डिझेलचा १०१.७९ रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत डिझेल ९३.८७ रुपये इतके वाढले आहे. चेन्नईत डिझेलचा भाव प्रती लीटर ९८.२८ रुपये इतका झाला असून कोलकात्यात डिझेलचा भाव ९७.२० रुपये झाला आहे.
(हेही वाचा ओबीसी-मराठा वाद पुन्हा पेटणार!)
Join Our WhatsApp Community