दाऊदशी संबंध असलेला नवाब मलिक तेही आतमध्ये गेले. याच शिवतीर्थावर शपथविधी झाला तेव्हा पहिला मंत्री छगन भुजबळ होते, ते काही स्वातंत्र्यसैनिक नव्हते, पण तुमच्या नाकावर टिच्चून त्यांना मंत्री करतात. जो अडीच वर्षे जेलमध्ये होता त्याला मी पहिला मंत्री करेन, असे ते म्हणतात. बॉम्बस्फोट घडवलेल्या दाऊदशी संबंध मलिक जेलमध्ये गेले जाताना तुम्हाला अंगठा दाखवतात, हे सगळे तुम्हाला मेंढरा सारखे वापरत आहेत, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्क येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते. कुणी उद्या तुम्हाला फरफटत न्यावे आणि तुम्ही टाळ्या वाजवाव्यात आणि विसरून जावे, हे विसरून जावे हेच यांना हवे आहे. रोज नवीन बातम्या. सकाळी पकपक होते. या बाजूने कुणी बोलणार, त्या बाजूने कुणी बोलणार आणि मूळ विषय भरकटवायचा. मुकेश अंबानींच्या घरासमोर सचिन वाझे जिलेटीनच्या कांड्या भरून गाडी ठेवतो, हे सहज झाले होते का, मी तेव्हाच सांगितले होते, याचे उत्तर मिळणार नाही, ते विषय भरकटवणार, तसेच झाले. आज कुणीच त्या विषयावर बोलत नाही. बॉम्बची गाडी का ठेवली याचे उत्तर मिळत नाही, त्यानंतर पोलीस आयुक्ताला काढून टाकले जाते, गृहमंत्री जेलमध्ये जातो, हे सगळे तुम्हाला आठवते का? तुमच्या याच विसरण्याचा फायदा घेतला जात आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र कुठे नेवून ठेवला?
आम्ही भाषणे का करावी, का तुम्ही ऐकायला येता, उद्या परत विसरून जाता. लोकशाही इंग्लंडमधील पहा, दुसरे महायुद्ध चर्चिलने जिंकून दिले, पण आठ महिन्यात निवडणूक झाल्या, तेव्हा चर्चिल हरले, त्यावेळी पत्रकारांनी विचारले ‘तेव्हा चर्चिल युद्ध काळात चांगले होते शांततेत नाही’, असे उत्तर मिळाले. याला समज म्हणतात. आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. जो इतिहास विसरला त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला आहे. वैभवशाली महाराष्ट्र कुठे आणून ठेवला, गृहमंत्री जेलमध्ये जातो, अतिरेक्यांशी संबंध म्हणून दुसरा मंत्री जेलमध्ये जातो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु आहेत तरी सरकार सुरु आहे. काय सुरु आहे महाराष्ट्रात? शिवरायांनी पत्र लिहिले होते, त्यात कारभार असा करावा, तर रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये’, असे म्हटले होते. रयत म्हणजे शेतकरी, सामान्य नागरिक होते. आज काय सुरु आहे. एसटी कमर्चारी, पोलीस रडत आहेत, शिक्षणाचा बट्याबोळ, शेतकरी आत्महत्या सुरु आहे, महाराष्ट्रात नोकऱ्यांमध्ये आधी मराठी माणसाला प्राधान्य दिले पाहिजे. उत्तर प्रदेशात विकास झाला पाहिजे, हेच मला पाहिजे. मोदी जेव्हा सत्तेवर आले तेव्ह युपी, बिहार आणि झारखंड यांचा विकास करावा, असे मी म्हटले होते. सगळ्यांचे ओझे घ्यायला महाराष्ट्र बसला नाही. आज त्या राज्यांचा विकास होत आहे, चांगले सुरु आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. शेतकरी आत्महत्या करतो, नोकऱ्या मिळत नाही यामागे परकीय लोकांचा हात आहे का, नाही आमच्यात दळभद्री लोकांची धोरणे कारणीभूत होते. ज्याने काम केले त्याला घरी बसवले आणि ज्याने काम केले नाही त्याला सत्तेवर बसवले नाशिक महापालिकेत मतदारांनी हेच केले. मग चांगुलपणाची अपेक्षा बाळगू नका, असेही राज ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community