मागच्या काही दिवसांपासून इंधन दरवाढ सुरुच आहे. डिझेलचे दर झपाट्याने वाढत आहेत. 20 मार्च 2022 पासून सुरु असलेली दरवाढ कायम आहे. त्यामुळे अनेक मालवाहतूकदार काही काळ व्यवसाय बंद ठेवण्याच्या विचारात आहेत. ही दरवाढ जर अशीच सुरु राहिली तर वाहनांचे सुटे भाग आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती पुन्हा भडकण्याची शक्यता आहे.
सर्वसामान्यांना पोहोचणार झळ
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव 120-130 डाॅलर प्रतिबॅरल पोहोचल्यानंतर ही दरवाढ अपेक्षितच होती. त्यामुळे देशातील पेट्रोलियम वितरण कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. मागच्या दहा दिवसांत ही नववी दरवाढ आहे. शुक्रवारी डिझेलचा दर प्रतिलीटर 101 रुपये नोंदवण्यात आला. ही वाढ जर अशीच सुरु राहिली तर माल वाहतूक महागणार आहे. याचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा: त्यांचे हेच वैशिष्ट्य आहे; पवारांनी केले राज यांना लक्ष्य )
म्हणून ऑर्डही घटल्या
वर्षभरात डिझेल 13 रुपयांनी महागले. तसेच, अनेक विमा कंपन्यांनीही प्रीमियममध्ये वाढ केली. डिझेलच्या वाढत्या दरांबाबत ट्रान्सपोर्टर्सनी चिंता व्यक्त केली आहे. इंधनात सततच्या होणा-या दरवाढीमुळे मालवाहतुकीचे दर वाढले आहेत. त्यामुळे आता ऑर्डरही घटल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community