प्रवीण दरेकर रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी रवाना..कधी परतणार?

92

आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मुंबई बॅंक बोगस मजूर प्रकरणात दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी, मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली असून, त्यांना सोमवारी सकाळी 11 वाजता माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आता याच प्रकरणात दरेकर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.

अटक होणार?

प्रवीण दरेकर आता पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर झाले आहेत. पण या प्रकरणात दरेकरांना पोलीस अटक करु शकत नाहीत कारण सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर, दरेकरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यास बंदी केली आहे.

( हेही वाचा :श्रीलंकेत राजकीय उलथापालथ; पंतप्रधानांच्या मुलासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा )

काय आहे प्रकरण

मजूर नसतानाही गेली 20 वर्षे मजूर असल्याचे खोटे भासवून प्रवीण दरेकर मुंबई बँकेवर संचालक/ अध्यक्ष म्हणून निवडून येत आहे. या 20 वर्षात मुंबई बँकेत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले असून त्याबाबत सहकार विभागाने वेळोवेळी सहकार कायदा 1960 च्या कलम 89 अ अंतर्गत चौकशी करून अहवाल दिलेले आहेत. 2015 पासून ‘नाबार्ड’च्या प्रत्येक अहवालात मुंबई बँकेतील अनियमितता व घोटाळ्यांवर ठपका ठेवलेला आहे. 2013 साली सहकार विभागाने 89 अ अंतर्गत केलेल्या चौकशीत संचालक मंडळाने मुंबई बँकेची व ठेवीदारांची फसवणूक केल्याचे, विश्वासघात केल्याचे स्पष्टपणे नमूद करत कारवाईची शिफारस केली होती. मात्र 2013 च्या या अहवालावर सहकार विभागाने आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.