गेल्या काही वर्षांपासून संत्र उत्पादक शेतकरी कधी अवकाळी, गारपीट तर कधी व्यापाऱ्यांच्या पिळवणुकीला बळी पडत आहेत. यंदा संत्र बागांमध्ये आंबिया बहर आहे. मात्र अतिउष्णतेमुळे व वातावरणातील बदलामुळे आंबिया बहराची फळे गळत आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. राज्यात सर्वाधिक १ लाख ५० हेक्टर संत्रा फळ पिकांचे क्षेत्र विदर्भात आहे; परंतु सतत बदलत असलेल्या हवामानाचा संत्र फळ पिकांवर परिणाम होत आहे.
( हेही वाचा : आता बारा रुपयांत पोहोचा नेपाळला! )
कृषी विभागाने यावर मार्गदर्शन करावे
मागील पंधरा ते सतरा वर्षांपासून विदर्भातील पावसाची अनिश्चितता जाणवत असून, एक, दोन वर्षे सोडले, तर यातील बहुतांश वेळी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. या वर्षी ग्रामीण भागात सुरु असलेले लोडशेडिंग व वाढते तापमान यामुळे फळ उत्पादक शेतकरी डबघाईस आला आहे. गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना संत्र झाडे तोडावी लागली, जवळपास ४० ते ५० हजार हेक्टरवरील संत्र्यांची झाडे शेतकऱ्यांनी तोडली. यावर्षी अतिउष्णतेमुळे झाडावरची फळगळती सुरू झाल्याने संत्र उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. फळे गळून पडत आहेत. फळगळती सुरू झाल्याने संत्र उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार ,अचलपूर, मोर्शी, वरुड अशा अनेक तालुक्यात सध्या संत्र पिकाला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून कृषी विभागाने यावर मार्गदर्शन करावे व शासनाने गळतीचा सर्व्हे करून मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी संत्र उत्पादक शेतकरी करीत आहे.
Join Our WhatsApp Communityशेतकऱ्यांकडे विहिरी, कूपनलिकांची व्यवस्था आहे. मात्र पाण्याची पातळी खालावली आहे. विदर्भातील बुलडाणा, अमरावती जिल्ह्यातील स्थिती वाईट आहे.
मयूर देशमुख संत्र उत्पादक युवा शेतकरी