देशमुखांच्या खांद्याचे दुखणे जुनेच

92

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शुक्रवारी जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशमुख हे तुरुंगातील बाथरूममध्ये पडल्यामुळे खांद्याच्या दुखापत झाली आहे असे सांगण्यात आले. मात्र देशमुख यांच्या खांद्याचे दुखणे जुनेच असून तुरुंगात पडल्यामुळे खांदा जास्त दुखू लागला त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

( हेही वाचा : ओसी नसलेल्या इमारतींनाही सर्वसाधारण दराने पाणी पुरवठा: मार्गदर्शक धोरण बनवण्याची कार्यवाही सुरु )

जे जे रुग्णालयात दाखल

मनी लॉंड्रिंगच्या गुन्हयात मागील काही महिन्यांपासून आर्थर रोड तुरुंगात कैद असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे शुक्रवारी तुरुंगात बाथरूम मध्ये जात असताना घसरून पडल्यामुळे त्यांच्या खांद्याला मार लागल्यामुळे त्यांचा खांदा दुखू लागला. तुरुंग प्रशासनाने देशमुख यांना तुरुंगातील डॉक्टरांकडे आणले असता त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल असे सांगितल्यानंतर त्यांना जे जे रुग्णालयात आणण्यात आले, जे जे रुग्णालयात अस्थिव्यंग विभागात देशमुख यांना दाखल करण्यात आले आहे.

खांद्यावर शस्त्रक्रिया

सूत्रांच्या म्हणण्यानुसार अनिल देशमुख यांच्या खांद्याचे दुखणे जुने आहे, वर्धा येथे काही वर्षांपूर्वी झालेल्या सभेत त्यांच्या खांद्याला मार लागल्यामुळे त्यांचा खांदा निखळला होता. तेव्हापासून त्यांच्या खांद्याचे दुखणे कायम आहे. हे दुखणे मध्येच उद्भवते अशावेळी त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्ती त्यांच्या खांद्याला आधार देत असल्यामुळे कळून येत नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. देशमुख हे तुरुंगात एकटे पडल्यामुळे त्यांना कुठलाही आधार नसल्यामुळे तसेच ते बाथरूममध्ये पडल्यामुळे खांदयाचे दुखणे अधिकच उद्भवले असल्याचे समजते, तसेच यावेळी त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे देखील समजते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.