गुढी पाडव्याला संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले गेले. सणासुदीला वाढलेल्या या मागणीमुळे आता सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. मंगळवारी कमाॅडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. सध्या मल्टी कमाॅडिटी एक्सचेंमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51 हजार 640 रुपये असून त्यात 140 रुपयांची वाढ झाली आहे. सोमवारी सोनं 270 रुपयांनी स्वस्त झाले होते. मंगळवारी चांदीच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे.
#Gold and #Silver Opening #Rates for 05/04/2022#IBJA pic.twitter.com/tYWu8ab6FK
— IBJA (@IBJA1919) April 5, 2022
एमसीएक्सवर एक किलो चांदीचा भाव 66 हजार 720 रुपये असून त्यात 425 रुपयांची वाढ झाली आहे. मंगळवारी चांदीचा भाव 66 हजार 736 रुपयांपर्यंत वाढला होता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनुसार सोमवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव 51 हजार 485 रुपये इतका होता. एक किलो चांदीचा भाव 66 हजार 628 रुपये इतका होता.
( हेही वाचा: राऊतांनी राज्यपालांवर खालच्या भाषेत केली टीका म्हणाले…)
तीन आठवड्यात स्वस्त झालं सोनं
रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली होती. भारतीय कमाॅडिटी बाजारात सोन्याचा भाव 55 हजार 600 रुपयांवर गेला होता. मात्र त्यानंतर त्यात मोठी घसरण झाली आहे. मागील तीन आठवड्यात सोन्याचा भाव 1 हजार 250 रुपयांनी कमी झाला आहे. तर याच कालावधीत चांदी 2 हजार 900 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
Join Our WhatsApp Community