भारतातील श्रीमंत व्यक्ती म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते म्हणजे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी. सर्वसामान्यांनी कल्पनाही केली नसेल इतका पैसा या प्रसिद्ध उद्योजकांकडे आहेत. अशातच अंबानी आणि अदानी यांच्यासंदर्भातील एक बातमी समोर आली आहे. मुकेश अंबानी यांचं नाव आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीमध्ये असल्याचे तुम्हाला माहिती असेल. मात्र आता अंबानींना एका भारतीय उद्योजकाने मागे टाकले आहे. या भारतीय उद्योजकाचे नाव म्हणजे गौतम अदानी. गौतम अदानी यांनी अंबानींना मागे टाकून आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींचा क्रमांक पटकावला आहे. इतकंच नव्हे तर जगातील टॉप 10 श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये गौतम अदानींचा समावेश आहे.
(हेही वाचा – दुसरा धक्का! आणखी एका पदाधिकाऱ्याचा मनसेला रामराम)
कोणी कोणाला टाकले मागे?
ब्लूमबर्ग बिलियनायर्स इंडेक्सच्या लेटेस्ट आकडेवारी जाहीर केली असून या आकडेवारीनुसार, अदानी समुहाचे मुख्य गौतम अदानींची एकूण संपत्ती 100 अब्ज डॉलरच्या पार गेली आहे. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क 288 अब्ज डॉलर्स इतक्या संपत्तीमुळे जगातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानावर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची संपत्ती 193 अरब डॉलर्स आहे. त्यामुळे ते श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. फ्रेंच उद्योगपती आणि जगातील सर्वात मोठी लक्झरी वस्तू कंपनीचे मालक बर्नार्ड आरनॉल्ट श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची संपत्ती 150 अरब डॉलर्स आहे. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे चौथ्या स्थानावर असून त्यांची संपत्ती 134 अरब डॉलर्स इतकी आहे.
जगातील ‘टॉप 10’ श्रीमंत व्यक्ती कोण?
सर्वाधिक नफा कमावणारे उद्योजक अदानी
ब्लूमबर्ग बिलियनायर्स इंडेक्सनुसार गौतम अदानींच्या संपत्तीमध्ये यावर्षी 24 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. अदानी यावर्षी जगातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या उद्योजकांमधील एक ठरले आहेत. 2 वर्षात त्यांची संपत्ती जवळपास दुप्पट झाली आहे. ग्रीन एनर्जीशी संबंधित त्यांच्या कंपनीचा व्यवसाय वेगाने पसरत आहे.
Join Our WhatsApp Community