पुणे परिवहनमध्ये १०० टक्के ग्रीन बस!

72

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यातील आयुर्मान ओलांडलेल्या 41 डिझेल बसेस ‘सेवानिवृत्त’ झाल्या आहेत. त्यामुळे आता पीएमपी पूर्णत: ‘ग्रीन’ एनर्जीचा वापर करणारी पहिली, सार्वजनिक परिवहन वाहतूक यंत्रणा ठरणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

( हेही वाचा : वादग्रस्त पाठ्यपुस्तक! येथे शिकवले जातात हुंडा घेण्याचे फायदे )

आयुर्मान ओलांडलेल्या डिझेल बसेस ‘सेवानिवृत्त’

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे, पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागात सेवा देण्यात येते. पीएमपीच्या ताफ्यातील ‘ग्रीन’ एनर्जीवर धावणाऱ्या 1 हजार 900 बसेस असून, यामध्ये 1 हजार 590 सीएनजी आणि 310 इलेक्ट्रिक बसेस आहेत. पीएमपीच्या ताफ्यात याआधी 41 डिझेल बसेस देखील होत्या. परंतु आता या आयुर्मान ओलांडलेल्या 41 डिझेल बसेस ‘सेवानिवृत्त’ झाल्या आहेत.

एका डिझेल बसचे आयुर्मान 10 वर्षे असते. त्यानंतर या बसेस ‘स्क्रॅप’ पॉलिसीअंतर्गत संचलनातून बाद करण्यात येतात. या बसेससाठी सुमारे 6 हजार लिटरपेक्षा अधिक डिझेल दररोज वापरण्यात येत होते. बसेस हद्दपार झाल्याने सुमारे 46 लाख रुपयांची बचत दरमहा होणार आहे.

पीएमपीच्या ताफ्यात असणाऱ्या जुन्या 41 बसेस बाद करण्यात आल्या आहेत. तसेच उर्वरित मिडी बसचे रुपांतर सुद्धा इलेक्ट्रिक बसमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे पीएमपी वाहतूक व्यवस्थापक राजेश रुपनवर यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.