सध्या राज्यभरात तापमानाने उच्चांक गाठला असून मुंबईकर या गरमीमुळे चांगलेच हैराण झाले आहेत. उन्हाळयात प्रामुख्याने आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे असते. या दिवसात अनेकांना बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने उलट्या, जुलाब, डोकेदुखी, पोटाचे विकार होतात. यामुळेच उन्हाळ्यात बाहेर गाडीवर मिळणाऱ्या पदार्थांचे सेवन करताना सावध रहा. आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करून ताजे आणि घरी शिजवलेल्या अन्नाचे सेवन करा. उन्हाळ्यात आपल्याला अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. उन्हाळ्यात तापमान वाढल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासते. ज्यामुळे डिहायड्रेशन होते आणि अनेक वेळा गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच आपण आपल्या आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करणं खूप गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्या पदार्थांचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता.
( हेही वाचा : सोने वधारले! जाणून घ्या आजचा दर )
1. टोमॅटो- उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी टोमॅटोचे सेवन केले जाऊ शकते. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन-सी असतात. जे तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करते.
2. दही- दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असते आणि ते आपल्या आतड्यांसाठी खूप फायदेशीर असते. दह्यामुळे पचनक्रियाही चांगली राहते.
3. ताक- उन्हाळ्यात ताकही शरीरासाठी फायदेशीर आहे. ताक पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासोबतच उष्णतेपासून शरीराला आराम देते.
4. संत्र- उन्हाळ्यात शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी संत्र्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन-सी मोठ्या प्रमाणात असते.
5. कोशिंबीर- रोजच्या आहारात सॅलाडचा समावेश करा. काकडी, टोमॅटो, गाजर, द्राक्षे इत्यादींचा वापर सॅलडमध्ये करता येतो.
6. टरबूज/कलिंगड- उन्हाळ्यात कलिंगड किंवा टरबूजाचे सेवन करावे. या फळांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणी असते. यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.
Join Our WhatsApp Community