उन्हाळ्याची चाहूल लागताच शितपेय आणि बर्फ गोळे विक्रेते आता जागोजागी दिसू लागले आहेत. परंतु अमरावती जिल्ह्यात केवळ ३० ते ३५ ठिकाणीच खाद्य बर्फ बनविला जातो. त्यामुळे सध्या विक्री होणारा बर्फ गोळा शुद्धतेच्या मानकावर कितपत खरा उतरलेला आहे, याबाबत अद्याप अन्न व औषध प्रशासन अनभिज्ञ आहे. त्यात बर्फाला रासायनिक रंगाचा मुलामा चढविला जात असल्याने अमरावती जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.
( हेही वाचा : अन्यथा तुमच्या स्मार्टफोनचा होऊ शकतो स्फोट! )
अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे
उन्हाळा येताच शितपेय, वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस, बर्फ गोळा यासारख्या थंड पदार्थांची मागणी वाढते. प्रत्येक ज्यूस सेंटर व शितपेय विक्रीच्या दुकानांवर बर्फ हा लागतोच. परंतु या दुकानांमध्ये येणारा बर्फ नेमका कुठून येतो, याची तपासणी कुणीही करत नाही. त्यामुळेच आरोग्याच्या समस्या निर्माण होतात म्हणूनच आरोग्याच्या दृष्टीने याकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांनी केली आहे.
Join Our WhatsApp Communityशितपेय, बर्फ गोळा विक्रीच्या दुकानांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात बर्फ बनवण्यास ३० ते ३५ कारखान्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. – एस. डी. केदारे, सहाय्यक आयुक्त, अन्न.