महागाईचा भडका! आता PNG-CNG च्या दरांतही मोठी वाढ

85

डिझेल आणि पेट्रोलच्या दरांत सतत वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना या महागाईचा फटका बसत आहे. आता यात आणखी भर पडली आहे. मंगळवार मध्यरात्रीपासून पीएनजी आणि सीएनजीच्या दरांत मोठी वाढ करण्यात आली आहे. पीएनजी 7 तर सीएनजी 5 रुपयांनी महागले आहे.

ग्राहकांना दिलासा नाहीच

अवघ्या पाच दिवसांपूर्वी राज्य सरकारने व्हॅटच्या दरात कपात करत सीएनजी आणि पीएनजी ग्राहकांना दिलासा दिला होता. पण त्यानंतर लगेचच सहाव्या दिवशी पुन्हा एकदा सीएनजी, पीएनजी दरांत वाढ केली आहे. मुंबईत सीएनजीच्या किमतीत 7 रुपयांची तर पीएनजीच्या किमतीत 5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिलला राज्य सरकारने नैसर्गिक वायूवरील व्हॅटमध्ये कपात केली होती. मात्र बुधवारी झालेल्या दरवाढीने सीएनजी, पीएनजीचे दर पुन्हा एकदा मूळ किमतीवर पोहोचले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने केलेल्या व्हॅट कपातीचा ग्राहकांना फायदा झालाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

( हेही वाचा: राऊतांबाबत राज ठाकरेंची ती भविष्यवाणी खरी होणार? वाचा काय म्हणाले होते )

सीएनजी गॅसच्या दरात वाढ

महानगर गॅस लिमिटेडने (MGL)  सीएनजी आणि पीएनजीच्या (CNG, PNG Price) दरांमध्ये वाढ केली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सीएनजी गॅसच्या दरात 2.50 रुपयांनी वाढ केल्यानंतर आता सीएनजीचे दर 66.61 रुपये प्रति किलो झाली आहे. गेल्या 5 दिवसांत सीएनजी 6.60 रुपये किलोने महागला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.