गेल्या महिन्यापासून राज्यभरात तापमानाने उच्चांक गाठला आहे. येत्या काही दिवसात मुंबई आणि उपनगरांतील नागरिकांना आणखी उष्मा सहन करावा लागण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सांगली, कोकणातील अनेक भागांमध्ये पाऊस पडल्याने राज्यभरात उष्म्याचे तडाखे आणखी जाणवू लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
पुढील काही दिवस दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. असे हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकरांनी ट्वीट केले आहे.
( हेही वाचा : महागाईचा भडका! आता PNG-CNG च्या दरांतही मोठी वाढ )
कमाल तापमानात वाढ
देशाच्या वायव्येकडील राज्यांत उष्णतेची तीव्र लाट असून तेथून महाराष्ट्राकडे येणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या प्रवाहामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे. सततच्या कोरड्या हवामानामुळे वायव्य भारताला उष्णतेचा सामना करावा लागत आहे. दिल्ली ते गुजरातपर्यंत पुढील ४-५ दिवस उष्णतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
6 April:
अगले 5 दिनों के दौरान हिमाचल प्रदेश, विदर्भ और बिहार के अलग-अलग हिस्सों में हीट वेव की स्थिति;
अगले 2-3 दिनों के दौरान मध्य महाराष्ट्र और जम्मू में;
6-8 Apr के दौरान झारखंड में;
7-10 Apr के दौरान दक्षिण पंजाब में;
9-10 Apr को छत्तीसगढ़ में हीट वेव की स्थिति
-IMD— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 6, 2022
राज्यातील काही भागात पाऊस
मंगळवारी अकोल्यात ४४.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते. पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात सलग पावसाचा अंदाज आहे.
Join Our WhatsApp Community5 April: पुढील 2, 3 दिवस दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
Take care
– IMD pic.twitter.com/sQrmkpzGCF— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 5, 2022