INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी नागरिकांकडून गोळा केलेल्या निधीत कोट्यवधींचा अपहार केल्याचा आरोपावरुन भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर ट्राॅम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी रात्री उशिरा ट्राॅम्बे पोलीस ठाण्यात ही तक्रार केली आहे. कलम 420, 406, 34 अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
रात्री उशिरा गुन्हा दाखल
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी भोसले आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह बुधवारी संध्याकाळी अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
( हेही वाचा: शिवसेना की राष्ट्रवादीचे; सांगा राऊत कोणाचे? )
हे आहे प्रकरण
किरीट सोमय्या हे शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचा आरोप करत असतात. बुधवारी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा करण्यात आलेला निधी हा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सोमय्यांनी म्हटले होते. आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबाबत ही माहिती मागवली होती. मात्र, राज्यपाल कार्यालयात असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाने दिली असल्याचे राऊत यांनी म्हटले. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community