JEE Main 2022: परीक्षेत बदल, जाणून घ्या कोणत्या महिन्यांत होणार परीक्षा?

97

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मेन २०२२ सत्र-१ परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत. पूर्वी जेईई मेन परीक्षा १६ एप्रिल ते २१ एप्रिल या कालावधीत होणार होती परंतु आता ती २१, २४, २५, २९ एप्रिल आणि १, ४ मे २०२२ रोजी होणार आहे. या संदर्भात एनटीएने अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी केली आहे. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विद्यार्थी तपशील तपासू शकतात. सुधारित वेळापत्रकानुसार पहिल्या सत्राच्या परीक्षा २० ते २९ जून, तर दुसऱ्या सत्राच्या परीक्षा २१ ते ३० जुलै दरम्यान घेतल्या जाणार आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने बुधवारी रात्री हे जाहीर केले आहे.

कोणत्या शहरांमध्ये होणार परीक्षा?

यापूर्वी या परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यांत नियोजित होत्या. मात्र आता या परीक्षा जून आणि जुलै महिन्यांत घेण्यात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून देण्यात आली आहे. परीक्षेचे ॲडमिट कार्ड त्यासोबतच कोणत्या शहरांमध्ये परीक्षा होणार याबाबत लवकरच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. तसेच, जेईई मेन परीक्षेत २५००० पर्यंत रँक मिळवणाऱ्या उमेदवारांना जेईई अॅडव्हान्स्डमध्ये बसण्याची संधी दिली जाते. IIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE Advanced परीक्षा घेतली जाते.

(हेही वाचा – संपातून माघार घेत एसटी कर्मचारी परतले माघारी!)

परीक्षेच्या अधिक माहितीसाठी एनटीएच्या अधिकृत www.nta.ac.in किंवा jeemain.nta.nic.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना एनटीएच्या अधिकृत nta.ac.in या संकेतस्थळावर वेळापत्रक पाहता येणार आहे. जेईई मेन- २०२२ संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार ०११-४०७५९०००/६९२२७७०० या क्रमांकावर किंवा [email protected] पर ईमेल करू शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.