मग भारतात कशाला ? ‘अजान’ वादावर अनुराधा पौडवाल यांचे वक्तव्य

116

अलिकडेच राज ठाकरेंनी मुंबईत मशिदींवर लावलेल्या लाऊडस्पीकरच्या आवाजावर आक्षेप घेतला. त्यामुळे सध्या सगळीकडे लाउडस्पीकरवर अजान हा वाद चांगलाच तापला आहे. याविषयी समाजमाध्यमांवर सुद्धा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

…तर इतर लोकही लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवतील

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात संवाद साधताना अनुराधा पौडवाल म्हणाल्या, ‘मी जगात अनेक ठिकाणी फिरले. मी भारतात जे पाहिले असे कुठेही पाहिले नाही. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, पण आपल्या इथे याला जबरदस्तीने प्रोत्साहन दिले जात आहे. मशिदीवर लाउडस्पीकर लावत अजान वाजवली जाते. त्यामुळे इतर धर्मियांना वाटतं की आम्ही असे का करू नये.”

 ( हेही वाचा : महापालिका रुग्णालयांमधील कपड्यांची धुलाई आता अत्याधुनिक टनेल लाँड्रीत! )

संस्कृती आणि धर्माबाबत जागरूकता 

अनुराधा पौडवाल म्हणाल्या, ‘मी आखाती देशांमध्ये सुद्धा फिरले आहे. लाऊडस्पीकरच्या वापरावर तिथे बंदी आहे. जेव्हा मुस्लीम देशही त्याला प्रोत्साहन देत नाहीत, तेव्हा भारतात त्याची गरजच काय?’ ही प्रथा अशीच सुरू राहिल्यास इतर लोकही लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्यास सुरुवात करतील, असेही त्या म्हणाल्या. भारतातील तरुण पिढीला देशाची संस्कृती शिकवली पाहिजे. आपण सर्वांनी आपली संस्कृती आणि धर्माबाबत जागरूक असले पाहिजे. आदि शंकराचार्य हे आपले धर्मगुरू आहेत हे त्यांना कळायला हवे. हिंदूंनी चार वेद, १८ पुराणे आणि चार मठ आहेत, हे आपल्या धर्माबद्दल जाणून घेतले पाहिजे.” असे त्या म्हणाल्या.

लाउडस्पीकरच्या वापरावर एखाद्या सेलिब्रिटीने आक्षेप घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनुराधा पौडवाल यांच्या आधी गायक सोनू निगमने 2017 मध्येही याबाबत वक्तव्य केले होते. मात्र, सोनू निगमला त्याच्या ट्वीटमुळे ट्रोल व्हावे लागले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.