जरंडेश्वर साखर कारखाना शेतकऱ्यांना द्या! सोमय्यांची ईडीकडे मागणी

106

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या मालकीचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. हा कराखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी सोमय्या यांनी  गुरुवार, ७ एप्रिल रोजी काही शेतकरी सभासदांसह थेट ईडी कार्यालय गाठले.

 जरंडेश्वर कारखान्यासंबंधी ईडीला निवेदन

अजित पवार यांनी केलेला १२०० कोटींचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना घोटाळा सिद्ध झाला आहे. ईडीने या कारखान्याची संपत्ती जप्त केली. त्याला न्यायालयाने मान्यता दिली. त्यामुळे केंद्र सरकार आणि ईडीने हा कारखाना २७ हजार शेतकऱ्यांना ताब्यात द्यावा, असे सोमय्या म्हणाले. जरंडेश्वर कारखान्याच्या संदर्भात आम्ही ईडीला निवेदन दिले आहे आणि हा कारखाना २७ हजार शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी आम्ही केली आहे. याचबरोबर जर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संबंध या कारखान्याशी नसेल, तर त्यांनी तो कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात देत आदर्श उदाहरण ठेवावे, असेही भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

(हेही वाचा संपकरी एसटी कामगारांच्या हाताला काही लागले नाही!)

कारखान्याची संपत्ती जप्त करण्याची मान्यता

सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या व्यवहारासंबंधीची कागदपत्रे २१ ऑक्टोबर २०२१ रोजी ईडीसमोर सादर केली होती. ही कागदपत्रे सादर करताना सोमय्यांसोबत कारखान्याचे तत्कालीन पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. यामुळे अजित पवारांपुढील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. या प्रकरणामध्ये आता न्यायालयाने संबंधित कारखान्याची संपत्ती जप्त करण्याचा ईडीच्या कारवाईला मान्यता दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.