…तर त्या घोरपडीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला होईल जन्मठेप!

74

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या घोरपड या सरपटणाऱ्या प्राण्यावर शिकाऱ्याने केलेल्या प्रकरणात महाराष्ट्र वनविभाग कायदेशीर तज्ञांचा सल्ला घेत आहे. वन्यप्राण्यावर अनैसर्गिक संभोग केल्याप्रकरणी आयपीसी कलम 377 लावण्याची जय्यत तयारी वनविभागाने केली आहे. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा सिद्ध झाल्यास या नराधमाला जन्मठेपेचीही शिक्षा होऊ शकते.

तो व्हिडीओ ठरणार पुरावा

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात शिकारीसाठी गेलेल्या तीन शिकाऱ्यांपैकी एका शिकाऱ्याने वनविभागाने तयार केलेल्या तपास पथकासमोर आपल्या या अनैसर्गिक कृत्याची कबुलीही दिली. या घटनेचा आरोपीच्या मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडीओदेखील आहे. घोरपडवर बलात्कार करताना त्याने चक्क मोबाईलमध्ये व्हिडीओही काढला. आता हाच पुरावा वनविभाग त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी वापरणार आहे. फॉरेन्सिक प्रयोगशाळेतून या व्हिडीओ आणि फोटोची पडताळणी झाली की न्यायालयात आयपीसी कलम 377 लावण्याचा दावा वनविभाग करेल, अशी माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे प्रकल्प संचालक आणि वनसंरक्षक नानासाहेब लडकत यांनी दिली. पाच दिवसांची वनकोठडी संपल्यानंतर गुरुवारी न्यायालयासमोर सुनावणीदरम्यान केवळ एक दिवसाची वनकोठडी न्यायालयाने वाढवून दिली.

विकृतीहूनही भयानक

घोरपडीवर अनैसर्गिक संभोग करणे ही नराधमाची केवळ विकृती म्हणता येणार नाही. हा प्रकार विकृतीहून भयानक असल्याचा दावा मानसोपचारतज्ज्ञांनी केला आहे. नराधमासाठी वनविभाग मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणार आहे.

( हेही वाचा :रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुकारला संप! )

वनगुन्ह्यांची एकामागून एक कठोर कलमे लागू

व्याघ्र संवर्धित क्षेत्रात अवैध संचार (ट्रेसपासिंग), जंगलात अवैध शस्त्रास्त्रे बाळगणे, वनसामग्रीची नासधूस करणे, वन्यप्राण्यांची शिकार करणे, त्यांना जंगलातून फरफटत नेणे आदी वनगुन्ह्यांतर्गत तिन्ही आरोपींना वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत कठोर कलमे लागू करण्यात आली आहेत. आरोपी याआधीही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात शिकारीसाठी आले होते, त्यावेळी त्यांनी जंगलातील केमेरा ट्रेप तोडल्याची कबुली दिली आहे.

काय आहे नेमके प्रकरण

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे येथील ल गाभा क्षेत्रात विनापरवाणा शस्त्रास्त्रासह घुसलेल्या तीन आरोपींना एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला वनविभागाने पकडले होते. त्यांच्या चौकशीवेळी आरोपींचा मोबाईल तपासला असता, एका आरोपीच्या मोबाईलमध्ये घोरपडीवर त्याने बलात्कार करत व्हिडीओ आणि फोटो काढल्याचे आढळले. तिन्ही आरोपींच्या मोबाईलमध्ये शिकार केलेल्या प्राण्यांची छायाचित्रेही मिळाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.