युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबई येथे पहिल्या डिजीटल कॉंक्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. बँकेत डिजीटल बँक निर्माण करण्याच्या दिशेने हा प्रयत्न आहे.
या बैठकी (कॉंक्लेव्ह)दरम्यान एमडी आणि सीईओ श्री राजकिरण राय यांनी ‘युनियन संभव – वर्ल्ड ऑफ अपॉर्च्युनिटीज’ या भविष्यातील डिजीटल सिद्धतेसाठी परिवर्तन प्रकल्पासह आगामी सुपर अॅप UNIONNXT – Do it Yourself (युनियन नेक्स्ट – डू इट युअरसेल्फ) चे उदघाटन केले. या डिजीटल उपक्रमाचा मुख्य भर हा प्रगत पद्धतीने, प्रामुख्याने डू इट युअरसेल्फ (स्वयंसिद्धता) उद्देशाने सर्व प्रकारच्या बँकिंगसाठी ग्राहकांचे सक्षमीकरण करणे आहे.
( हेही वाचा : विमान प्रवाशांसाठी ‘बेस्ट’ आली धावून… )
ग्राहक अनुभवासह प्राथमिक उद्देश (डिझाईन थिंकिंग)च्या स्वरुपात पाच ग्राहककेंद्री डिजीटल अर्थसाह्य (सर्वसमावेशक एसटीपी) प्रवास जसे की, पूर्व-संमत वैयक्तिक कर्ज (पीएपीएल), युनियन कॅश (निवृत्तीधारकांसाठी कर्ज), शिशू मुद्रा लोन, एमएसएमई लोन-ऑटो-रिन्यूअल, केसीसी लोन-ऑटो-रिन्यूअलचे उद्घाटन डिजीटल कॉंक्लेव्ह दरम्यान झाले. बँकेच्या मोबाईल बँकिंगवर नवीन डेटा-आधारित आकर्षक उत्पादने आणि सेवांचा समावेश आहे. या कार्यक्रमात सॉफ्ट-पीओएस आणि सीआरएम अॅप्लिकेशनची सुरुवात करण्यात आली.
या डिजीटल प्रवासांचे विशेष आकर्षण मोबाईल फर्स्ट, ग्राहक-केंद्री, वृद्धिंगत कामकाजी क्षमता, कार्यवाहीसाठी कमी वेळ, किमान क्लिक्स, शून्य शाखा भेटी इत्यादी आहेत.
या सोहळ्यात बँकेच्या आगामी डिजीटल प्रकल्पांचे सादरीकरण देखील करण्यात आले, हे प्रकल्प अंतीम अंमलबजावणीकरिता विकासाच्या विविध टप्प्यांवर आहेत. यामध्ये डिजीटल सक्षमीकरणात विमा, म्युच्युअल फंड, गोदामांसाठी अर्थसाह्य, जीएसटी रोख-तरलता आधारित कर्जसुविधा, तरूण आणि किशोर मुद्रा लोन, सह-कर्ज तसेच पूल बाय-आऊट, गृह कर्ज आणि शैक्षणिक कर्जांचा समावेश आहे.
डिजीटायजेशन विभागाची सुरुवात
याप्रसंगी बोलताना युनियन बँक ऑफ इंडियाचे एमडी आणि सीईओ श्री राजकिरण राय म्हणाले, “प्रोजेक्ट ‘संभव – वर्ल्ड ऑफ अपॉर्च्युनिटीज’ आणि सुपर अॅप UNIONNXT – Do it Yourself (युनियन नेक्स्ट – डू इट युअरसेल्फ)सह, युनियन बँक ऑफ इंडिया डिजीटल परिवर्तनाला चालना देत ग्राहकांसाठी व्यावसायिक विचार आणि उद्योग आवश्यकतेसह अस्सल-वैश्विक मूल्य मिळवून देईल, असा मला विश्वास आहे.”
वाढत्या डिजीटल व्यवसायाचा प्रमुख हिस्सा मिळवण्यासाठी आणि सशक्त डिजीटल वातावरण निर्मितीसाठी युनियन बँक ऑफ इंडियाचे डिजीटल कॉंक्लेव्ह एक महत्त्वाचे पाऊल ठरेल अशी बँकेला आशा आहे. केवळ एक वर्षापूर्वी युनियन बँक ऑफ इंडियाने सहजसुलभ डिजीटल अनुभव आणि चांगली ग्राहकसेवा देण्यासाठी डिजीटायजेशन विभागाची सुरुवात केली होती.
Join Our WhatsApp Community