एसटी कर्मचा-याचा संशयास्पद मृत्यू, परळ एसटी आगारापासून काही अंतरावर सापडला मृतदेह!

131
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर शुक्रवारी रात्री एका एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह परळ एसटी आगराजवळ सापडल्याने  एकच खळबळ उडाली आहे. या एसटी कर्मचाऱ्याच्या आकस्मिक मृत्यूची नोंद दादर पोलिसांनी केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात
महेश लोले असे या एसटी कर्मचाऱ्यचे नाव असून, तो कोल्हापूर येथे राहणारा आहे. शुक्रवारी रात्री दादर पोलिसांना परळ एसटी आगारापासून काही अंतरावर असलेल्या सारथी रेस्टॉरंट अँड बारच्या बाहेर महेश लोले यांचा मृतदेह मिळून आला होता. दादर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालय येथील शवविच्छेदन विभाग या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महेश लोले याच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या मारहाणीच्या जखमा अथवा निशाण आढळून आलेले नाही.
महेश लोले हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असून चार दिवसांपूर्वीच मुंबईत आले होते, अशी माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे, तसेच त्यांच्या सहकार्याने दिलेल्या माहितीनुसार ते शुक्रवारी आझाद मैदान किंवा आंदोलन स्थळी गेलेच नव्हते. मृत महेश लोले यांना दारूचे व्यसन होते. त्यांनी नशामुक्ती केंद्रात काही कालावधी घालवला असल्याची माहिती समोर आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. लोले यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले असून कुटुंबीय मुंबईकडे रवाना झाले असल्याचे पोलीसानी सांगितले. महेश लोले यांचा शवविच्छेदन अहवाल येणे बाकी असून, त्याचा मृत्यू कुठल्या कारणाने झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर कळेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.