एटीएममधून पैसे काढणा-यांसाठी महत्त्वाची बातमी. आता आरबीआयने मोठा निर्णय घेतला आहे. एटीएममधून कार्डशिवाय आता पैसे काढता येणार आहेत. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली आहे. डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, कार्डलेस व्यवहारात एटीएममधून कार्डशिवाय रोख पैसे काढता येणार आहेत. कार्डलेस व्यवहार कमीतकमी 100 रुपये, एका दिवसात जास्तीत जास्त 10 हजार रुपये किंवा एका महिन्यात 25 हजार रुपये रोख रक्कम काढता येणार आहे. असे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले.
फसवणूक होणार कमी
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या मते, या उपक्रमामुळे कार्ड क्लोन करुन पैसे काढण्याची फसवणूकही कमी होणार आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी चलनविषयक धोरण जाहीर केले.
असे काढा पैसे
कार्डविना एटीएममधून रक्कम काढण्यासाठी मोबाइल अँपचा (Mobile app) वापर करण्यात येणार आहे. ही पूर्ण प्रणाली ओटीपीच्या (OTP) मदतीने काम करते. ओटीपीच्या मदतीनेच मोबाइल अँपच्या माध्यमातून पैसे काढता येणार आहेत.
( हेही वाचा: आता मदरशांमध्येही ड्रेस कोड लागू, सरकारचा मोठा निर्णय! )
रेपो दरात बदल नाही
चालू आर्थिक वर्षाच्या या पहिल्या बैठकीत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने रेपो रेट बदललेला नाही. रेपो रेट 4 टक्के आणि रिझर्व्ह रेपो रेट 3.35 टक्के एवढाच ठेवला आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने व्याजदरात बदल न करण्याची ही सलग 11वी वेळ आहे. यापूर्वी 22 मे 2020 रोजी रेपो दरात शेवटचा बदल करण्यात आला होता.
Join Our WhatsApp Community