दहावी- बारावीच्या परीक्षांचे निकाल जूनमध्येच

81
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांच्या पेपर तपासणीचे कामकाज व्यवस्थित सुरू आहे. यामुळे या दोन्ही परीक्षांचे निकाल हे जूनमध्येच लावण्यात येणार आहेत. यंदा करोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या. बारावीची परीक्षा 7 मार्च ते 7 एप्रिल तर दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत घेण्यात आल्या.

शिक्षकांनी दिला होता इशारा

ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षण घेतात याच ठिकाणी त्यांना परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे परीक्षा प्रक्रिया सुरळीत झाली. ज्या विषयांचे पेपर झाले, त्याप्रमाणे त्यांच्या तपासणीचे कामकाजही शिक्षकांकडून करण्याला प्राधान्य देण्यात आले. काही शिक्षक संघटनांनी विविध प्रलंबित प्रश्न मार्गी न लागल्याने पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.

( हेही वाचा: लग्नाचे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवले तर… उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय )

तपासणीच्या कामावर फारसा परिणाम झालेला नाही

दरम्यान, या संघटनांना प्रलंबित प्रश्नाबाबत सकारात्मक आश्वासने मिळाल्यामुळे त्यांनी पेपर तपासणीत सक्रीयपणे सहभाग घेतला आहे. दरम्यान, विना अनुदानित शिक्षक संघटनांकडून अद्यापही आक्रमक पवित्रा घेत सक्षमपणे पेपर तपासणीचे कामकाज हाती घेतल्याचे आढळतेच असे नाही. त्यातच एसटी कर्मचारी संपामुळे पेपरची ने-आण करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्याचेही बोलले जात आहे. मात्र, या संपाचा पेपर तपासणीच्या कामकाजावर फारसा परिणाम होत नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.