कोविशिल्ड झाली स्वस्त, आता फक्त ‘या’ किंमतीत मिळणार लस

97

देशभरात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेमुळे कोरोनाला आटोक्यात आणण्यात मोठ्या प्रमाणात यश येत आहे. सध्या कोविड विरोधात लढण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. कोविडला प्रतिबंध करण्यासाठी भारतात कोविशिल्ड या लसीला सर्वाधिक मागणी आहे. या लसीच्या किंमतीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. या लसीच्या किंमतीत मोठी घट झाल्यामुळे सर्वसामांन्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.

इतक्या किंमतीत मिळणार लस

कोविशिल्ड लसीची किंमत निम्म्याहून कमी करण्याचा निर्णय सीरम इन्स्टिट्यूट घेण्यात आला आहे. खासगी रुग्णालयांना कोविशिल्ड लस आता 600 रुपयांऐवजी 225 रुपयांत मिळणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी याबाबतची माहिती दिली आहे. हा निर्णय जाहीर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेनंतर लसींच्या किंमती कमी करण्याचा हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, असे पूनावाला यांनी सांगितले.

(हेही वाचाः आता सर्वांनाच 10 एप्रिलपासून बूस्टर डोस!)

कोव्हॅक्सिनचे दर देखील कमी

कोव्हॅक्सिनचे उत्पादन करणा-या भारत बायोटेक कंपनीने देखील लसींच्या किंमती कमी केल्या आहेत. खासगी रुग्णालयांत 220 रुपयांत कोव्हॅक्सिन लस मिळणार आहे. लसींवरील जीएसटीच्या किंमतीत केंद्र सरकारने घट केल्यामुळे लसींच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

18 वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस

10 एप्रिलपासून 18 वर्षांवरील सर्वच नागरिकांना बूस्टर डोस दिले जाणार आहेत. आतापर्यंत देशातील 194 कोटी नागरिकांचे लसीकरण झाल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. खासगी केंद्रांवर देखील आता बूस्टर डोस मिळणार आहेत.

(हेही वाचाः म्हाडा वसाहतींसाठी मुद्रांक शुल्काचे धोरण बदलणार?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.