चार दिवसांपूर्वीच मुंबईत दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या महिलेच्या शरीरात कोरोनाचा नवा विषाणू आढळला होता. यावरून झालेला वाद ताजा असतानाच आता मुंबईतच पुन्हा एकदा एक्सई विषाणूचा रुग्ण आढळल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली. ७६ वर्षीय पुरुषाच्या कोरोनाचाचणीत एक्सई विषाणू आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली असून, या रुग्णाने मुंबईहून बडोद्याचा प्रवास केला आहे. हा रुग्ण मुंबईचा रहिवासी असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.
( हेही वाचा : कोविशिल्ड झाली स्वस्त, आता फक्त ‘या’ किंमतीत मिळणार लस )
या रुग्णाच्या जनुकीय चाचणीचा अहवाल नवी दिल्लीच्या एन.सी.डी.सी. या केंद्रीय संस्थेने दिला आहे. राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १२ मार्च रोजी रुग्णाला सौम्य ताप आल्याने कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. हा रुग्ण आता पूर्णपणे लक्षणेविरहित होता. या रुग्णाने कोविशिल्ड लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.
एक्स ई विषाणूबाबत –
हा विषाणू सर्वात पहिल्यांदा लंडन येथे आढळून आला. तीन महिन्यांतच लंडनमधील बहुतेक कोरोना रुग्णांना एक्सई विषाणूची बाधा झाली होती. या विषाणूचा प्रसार वेगाने होते. हा विषाणू बीए१, बीए२ या कोरोनाच्या विषाणूच्या उपप्रकाराचे मिश्रण आहे.
घाबरु नका….
कोरोनाच्या विषाणूमध्ये जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे हे नैसर्गिक प्रक्रिया असून, त्यामुळे लोकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन राज्य आरोग्य विभागाने केले आहे.
Join Our WhatsApp Community