अलिकडच्या काळात अनेकांना परदेशी उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असते अशा सर्व विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठाने दिलासा दिला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्रातर्फे विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यात जीआरई, टोफेल, आयईएलटीएस यांसारखे भाषा अभ्यासक्रम मोफत शिकवण्यात येणार आहेत.
निवडक विद्यार्थ्यांना संधी
‘सिलेक्ट युवर युनिव्हर्सिटी ऑनलाइन डिजिटल एज्युकेशन फाउंडेशन’ या दिल्ली येथील संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला असून करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, गिरीश भवाळकर, फाउंडेशनचे संचालक संदीप सिंग या वेळी उपस्थित होते.
( हेही वाचा : काम झाले, मात्र तरीही रेल्वे प्रवाशांची त्रासातून सुटका नाहीच )
या कराराच्या माध्यमातून जीआरई, टोफेल आदी परीक्षांबाबत मार्गदर्शन केले जाईल. निवडक विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली जाईल, असे डॉ. खरे यांनी सांगितले.
या बाबतची अधिक माहिती विद्यार्थ्यांना http://www.unipune.ac.in/dept/International Centre यावर उपलब्ध होईल.
Join Our WhatsApp Community