- आयटीआय केलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. देशातील सुप्रसिद्ध कंपनी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच ECIL ने कनिष्ठ तंत्रज्ञांच्या 1625 पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
( हेही वाचा : बूस्टरचा डोस महापालिकेच्या केंद्रावर मोफत! )
या भरतीअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि फिटर ट्रेड या पदांवर जॉइनिंग केले जाईल. www.ecil.co.in/ या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ११ एप्रिल आहे.
कोण अर्ज करू शकतो?
ITI पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय एक वर्षाची अप्रेंटिसशिप (कौशल्य विकास मंत्रालयाने जारी केलेली NAC) आवश्यक आहे. पात्रतेव्यतिरिक्त, अनुभवाचा स्वतंत्रपणे फायदा होईल.
रिक्त जागा
- इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसाठी – 814 पदे
- इलेक्ट्रिशियन साठी – 184 पदे
- फिटरसाठी – 627 पदे
परीक्षा नाही, गुणवत्तेनुसार निवड होईल
उमेदवाराची निवड गुणवत्ता यादीतून केली जाईल. निवड करण्यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. पात्र ठरलेल्या उमेदवारांना ऑफर लेटर जारी केले जातील. श्रेणीनुसार उमेदवाराची निवड केली जाईल.
अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या
- सर्वप्रथम ECIL च्या अधिकृत वेबसाइट www.ecil.co.in/ वर क्लिक करा.
- करिअर टॅब उघडा आणि नंतर ई-रिक्रूटमेंट वर क्लिक करा.
- त्यानंतर फॉर्म भरा आणि सबमिट करा.
एवढा पगार मिळणार
या भरतीसाठी पात्र उमेदवाराला पद मिळाल्यानंतर, पहिल्या वर्षी 20,480 रुपये प्रति महिना, दुसऱ्या वर्षी 22,528 रुपये प्रति महिना आणि तिसऱ्या वर्षी 24,780 रुपये प्रति महिना वेतन मिळेल.
Join Our WhatsApp Community