BEL Recruitment 2022: सरकारी नोकरीची मोठी संधी; 90 हजारांपर्यंत पगार

75

गेल्यावर्षी जे उमेदवार इंजिनिअर झाले आहेत, त्यांच्यासाठी सरकारी नोकरीची संधी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने इंजिनिअरिंग असिस्टंट ट्रेनी आणि टेक्निशिअन पदावर भरती सुरु केली आहे. या भरतीद्वारे 91 पदे भरली जाणार असून 90 हजारांपर्यंत पगार दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट bel-india.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

या पदांवर होणार भरती

अभियांत्रिकी सहायक प्रशिक्षणार्थी ( इंजिनिअरिंग असिस्टंट ट्रेनी ) आणि तंत्रज्ञ ( टेक्निशिअन ) या पदांसाठी ६ एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून त्याची शेवटची तारीख 20 एप्रिल असणार आहे. या भरती मोहिमेद्वारे सहाय्यक प्रशिक्षणार्थीच्या 66 आणि तंत्रज्ञांच्या 25 पदांसाठी भरती केली जाणार आहे.

(हेही वाचा – मुंबई महापालिका शाळांच्या मुलांना आर्थिक साक्षरतेचे धडे)

वयोमर्यादा

  • उमेदवाराचे वय 1 मार्च 2022 रोजी 28 वर्षांपेक्षा कमी असावे.
  • शासकीय नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी वयाची अट शिथिल आहे.
  • इतर मागासवर्गीयांना 3 वर्षांची आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता 

  • अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून 60 % गुणांसह 3 वर्षांचा अभियांत्रिकी पदविका केलेला असावा.
  • तंत्रज्ञांसाठी, उमेदवारांना SSLC + ITI + एक वर्षाची शिकाऊ उमेदवारी किंवा SSLC + 3 वर्षाचे राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्रासाठी विचारण्यात आले आहे.

अर्ज फी

राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. तर सामान्य, OBC पुरुष आणि EWS उमेदवारांना 250 रुपये + 18% GST भरावा लागेल. तर परीक्षा शुल्क डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / नेट बँकिंगद्वारेच भरले जाईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.