‘तो’ बहुरूपी पुन्हा डोके वर काढतोय! पंतप्रधानांनी दिला सावधानतेचा इशारा

165

कोरोना विषाणू अजून गेलेला नाही आणि पुन्हा तो डोके वर काढत आहे. महासाथीच्या विरोधात आपली लढाई सुरू ठेवा असा तो इशारा देत आहे. हा बहुरुपी विषाणू पुन्हा कधी डोके वर काढेल हे कोणालाच माहित नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जवळपास १८५ कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले आहेत आणि जे जनतेच्या सहकार्यामुळेच शक्य झाल्याचे ते म्हणाले. गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील मां उमिया धामच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले.

नैसर्गिक शेतीकडे वळा 

यावेळी मां उमिया यांच्या भक्तांना रासायनिक खतांच्या विळख्यातून पृथ्वी मातेला वाचवण्याच्या उद्देशाने नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. कोरोनाची महासाथ हे एक मोठे संकट होते आणि हे संकट आता संपले आहे, असे आम्ही म्हणत नाही. हा एक विराम असू शकतो. परंतु हा विषाणू पुन्हा केव्हा डोके वर काढेल हे सांगता येत नाही, असेही ते म्हणाले. हा एक बहुरुपी आजार आहे. याचा प्रसार थांबवण्यासाठी जवळपास १८५ कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले आहेत. हे लोकांच्या सहकार्यामुळेच शक्य झाल्याचे ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी पृथ्वीला वाचवण्याची गरज असल्याचे सांगितले, गुजरातमधील प्रत्येक गावातील शेतकऱ्याने नैसर्गिक शेतीसाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.

(हेही वाचा कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांनी केला भाजपचा प्रचार! ‘त्या’ विधानाचा भाजपाने उलगडला अर्थ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.