मुंबईच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी अगदी हमखास ठरलेली असते आणि प्रत्येकालाच पुढे जाण्याची घाई असल्यामुळे गाडीचे हाॅर्न मनसोक्त वाजवून पुढच्याला डिवचण्याची मुंबईकरांना सवय लागली आहे. पण आता ही सवय मात्र मुंबईकरांना मोडावी लागणार आहे. आता विनाकारण हाॅर्न वाजवाल तर पोलीस तुमची शाळा घेतील. सतत हाॅर्न वाजवणा-या चालकांना आता दंडासोबत वाहतूक नियमांचे धडेसुद्धा गिरवावे लागणार आहेत. पोलीस आयुक्तांनी ही नामी शक्कल लढवली आहे.
तर कारवाईला सामोरे जा
सतत वाजणा-या हा्ॅर्नमुळे ध्वनीप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे गरज नसताना जर का हाॅर्न वाजवला जात असेल, तर पोलीस त्याला वाहतूकीचे नियम शिकवणार आणि सोबत दंडही वसूल केला जाणार आहे. आता आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. जे सतत हाॅर्न वाजवून मुद्दाम कर्कश्श आवाज करतात, अशा लोकांवर कारवाई केली जाणार आहे.
( हेही वाचा: भंगार व्यापा-यांचा 100 कोटींचा जीएसटी घोटाळा उघड )
रुग्णवाहिकांवरही होणार कारवाई
विनाकारण हाॅर्न वाजवणा-याला पोलीस हाॅर्न कधी वाजवतात कधी नाही याचे धडे देणार आहेत. तसेच, तीन ते साडेतीन तास बसून वाहतुकीच्या नियमांचे धडे गिरवावे लागणार आहेत. आणि जर का नियम पाळले नाहीत, तर कारवाईदेखील केली जाणार आहे. रात्री अपरात्री रस्ते मोकळे असतानाही विनाकारण सायरन वाजवणा-या रुग्णवाहिकांवरही कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून पावले उचलण्यात येत आहेत. त्यांनाही आयुक्तांकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community