गुढीपाडवा मेळाव्याच्या वेळी राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांवर दिलेल्या भाषणाचे राज्यभरात पडसाद उमटले. हनुमान चालीसा आणि मशिदींवरील भोंगे यावरुन सध्या राजकीय वातावरण तापले असून, यात आता करणी सेनेने उडी घेतली आहे. रात्री दहानंतर मशिदींवरील भोंगे वाजले तर, करणी सेनेच्या कार्यकत्यांनी ते तोडून फेकून द्यावे, असे करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरजपाल सिंह अम्मू यांनी म्हटले आहे. औरंगाबाद येथे आयोजित करणी सेना महासंमेलनाच्या वेळी ते बोलत होते.
तर भोंगे उतरवले जाणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी या भोंग्यांच्यासमोर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला. त्यानुसार अनेक ठिकाणी मनसेतर्फे तशी आंदोलने सुरू झाली आहेत. यामध्ये आता करणी सेनेची भर पडत आहे. मशिदींवरील भोंगे रात्री दहानंतर वाजले, तर ते करणी सेनेच्या कार्यकत्यांनी काढावेत, असा इशारा सूरजपालसिंह अम्मू यांनी दिला.
( हेही वाचा: सावधान! विनाकारण हाॅर्न वाजवताय? पोलीस घेणार तुमची शाळा )
ओवेसींचा घेतला समाचार
उच्च न्यायालय संवैधानिक संस्था असून, निर्णय सर्वांसाठी बंधनकारक आहे. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार, देश चालतो उच्च न्यायालय त्याचाच एक भाग असल्याचे, त्यांनी स्पष्ट केले. ‘हम दो हमारे दो’ हाच न्याय सर्वांसाठी असावा, असा ठरावही महासंमेलनात घेण्यात आला. लवकरच लोकसंख्या नियंत्रण कायदा आणला जावा, यासाठी करणी सेना केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, राजपाल सिंह अम्मू यांनी पोलीस हटवा म्हणणा-या खासदार ओवेसींचा समाचार घेतला. पाच मिनिटे देशातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद करा, ओवेसीला पाकिस्तान सीमेवर सोडतो असे उद्गार यावेळी त्यांनी काढले.