मराठी अस्मिता मराठी अस्मिता दार उघड!

94

भुवया उडवत आणि डोळे गरागरा फिरवत संजय उवाच साहेब माजघरात प्रवेश करतात. त्यांची वाट पाहत असलेला एक पत्रकार लगबगीने उभा राहतो आणि मुजरा करतो पण त्या घाई गडबडीत चहाच्या कपात बुडवलेलं बिस्किट कपातंच पडतं.

( हेही वाचा : राज्यातील सरकारी रुग्णालयांत औषधंच नाहीत.. रुग्णांचे हाल! )

पत्रकार : (स्वतःशीच) ओह्ह शिट्स!

संजय उवाच: (भुवया उडवत) लै लो लै लो, चाय बिस्कुट लै लो.

पत्रकार : साहेब मी मराठी आहे. मराठीत बोलू शकता.

संजय उवाच : आम्ही कोणत्या भाषेत बोलावे हे सांगणारा तू कोण? तू काय स्वतःला पॉवरफुल्ल समजतोस का? आम्ही फक्त पॉवरफुल्ल माणसाचं ऐकतो.

पत्रकार : सॉरी…

संजय उवाच: (भुवया उडवत) इट्स ओके, यू आर वेलकम.

चुकीच्या जागी यू आर वेलकम आल्यामुळे पत्रकाराला काय बोलावं तेच कळेना. मैने आपका बिस्कुट चाय के साथ खाया हैं, असा संवाद मनातल्या मनात म्हणत त्याने आवंढा गिळावा तसा यू आर वेलकम गिळला.

संजय उवाच : (बच्चन साहेबांसारखे खुर्चीवर क्रॉस बसत.) विचारो, काय विचारताय तुम?

पत्रकार : (बेअरिंग पकडत) तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत…

संजय उवाच : (त्याचं वाक्य कापत. जोरजोरात उभुवया उडवत) कोणी आरोप केले? काय लायकी त्यांची? अरे मध्यमवर्गीय मराठी माणसावर, मराठी अस्मितेवर, या शिवरायांच्या महाराष्ट्रावर टिका करताना लाज कशी वाटत नाही ह्यांना? आता काय मध्यवर्गीय माणसाने मेहनतीने कोटीच्या कोटी रुपये कमवू नये?

पत्रकार : (धाडस एकवटत) पण साहेब. ते तर म्हणतात की तुम्ही म्हणजे मराठी अस्मिता नव्हे.

संजय उवाच : (भुवया झिकझॅक लाईटप्रमणे उडवत) कोण म्हणतं असं? कोण म्हणतं? ते दिल्लीचे एजेंट. अरे लाज वाटली पाहिजे स्वतःला मराठी म्हणवून घेण्याची. ही बाजूला खोली दिसतेय ना, त्यात राहते मराठी अस्मिता.

पत्रकाराला घाम फुटला. मराठी अस्मिता खोलीत? त्यांनी साहेबांकडे पुन्हा एकदा पाहिलं, तर त्यांच्या चेहर्‍यावर स्मितहास्य होतं आणि त्यांच्या भुवया उड्या मारत होत्या. त्याला धास्ती वाटली. साहेबांनी त्या खोलीचा दरवाजा उघडला आणि ते आत शिरले.

त्यांच्यासोबत पत्रकारही दबक्या पावलाने आत शिरला. आतलं दृश्य पाहून त्याच्या मनाचा थरकाप उडाला. आतमध्ये भलामोठा आरसा लावलेला होता. साहेब आरश्यात पाहून भुवया उडवत हसत होते. पण आरशातलं त्यांचं प्रतिबिंब मात्र खिन्नपणे उभं होतं. प्रतिबिंबाच्या भुवया स्थित होत्या, कपाळावार आठ्या आणि चेहर्‍यावर होते पराभवाचे भाव.

@ तात्या विंचू

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.