सर्वसामान्यांना खुशखबर! CNG आणि PNG च्या दरात कपात, नवे दर किती?

128

केंद्र सरकारने गॅस दराबाबत पारेख समितीच्या शिफारसी स्वीकारल्यानंतर महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. सीएनजी प्रतिकिलो ८ रुपये आणि पीएनजीत ५ रुपये स्टँडर्ड क्युबिक मीटरची (एससीएम) कपात करण्यात आली आहे. हे नवे दर शुक्रवार ७ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजल्यानंतर लागू होणार असल्याचे एमजीएलने सांगितले आहे.

( हेही वाचा : “विरोधकांनी हिंडनबर्गला जास्त महत्त्व दिले”, अदानी प्रकरणी काय म्हणाले पवार?; कॉंग्रेसलाही फटकारले )

केंद्र सरकारने पारेख समितीच्या शिफारसी स्वीकारल्यानंतर सीएनजी गॅसचे दर जाहीर केले गेले. मुंबई आणि जवळील परिसरात एमजीएल ही कंपनी प्रमुख सीएनजी, पीएनजी गॅस वितरक आहे. त्यामुळे सीएनजी गॅसच्या दर कपातीचा मोठा फायदा कार चालकांपासून ते रिक्षा चालकांनादेखील होणार आहे. सीएनजीच्या दरवाढीमुळे अनेकांचे बजेट बिघडले होते. या दरकपातीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

एलपीजीच्या तुलनेत पीएनजीचे दर स्वस्त 

मुंबई आणि जवळपासच्या शहरात सीएनजीच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. महानगर गॅस लिमिटेडकडून वितरीत होणाऱ्या सीएनजीचा दर प्रति किलो ७९ रुपये असणार आहे. तर, पीएनजीचा दर ४९ रुपये प्रति एससीएम असणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत आता सीएनजी आणि पीएनजी स्वस्त झाला असल्याचे महानगर गॅसने म्हटले आहे. पेट्रोलच्या तुलनेत 49 टक्के आणि डिझेलच्या तुलनेत 16 टक्के सीएनजी स्वस्त असल्याचे महानगर गॅसने म्हटले आहे. तर, एलपीजीच्या तुलनेत पीएनजीचा दर हा २१ टक्क्यांनी स्वस्त आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.