व्हेल मासा इतका मोठा का असतो? काय आहे रहस्य?

342
– जयेश मेस्त्री
काही प्राणी माणसांपेक्षा मोठे असतात, अवाढव्य असतात. अनेकांना असा प्रश्न पडतो की हे प्राणी इतके मोठे कसे होतात? नेमका कोणता घटक या प्राण्यांना मोठे करतो? व्हेल मासा तर खूप मोठा असतो. याचं वैज्ञानिक कारण काय असेल याची तुम्हाला उत्सुकता लागून राहिली असेल. आज आम्ही तुम्हाला याबाबतीत माहिती सांगणार आहोत.
काही वर्षांपूर्वी स्टॅनफोर्ट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी ३ हजार जीवंत व्हेल आणि ३ जीवाश्म व्हेल यांच्या संबंधित शरीर आणि वजनाच्या बाबतीत काही आकडे काढले आहे आणि त्यांचे विश्लेषण केले आहे. संशोधकांना यातून अनेक गोष्टी कळल्या आहेत. विश्लेषणातून ही गोष्ट समोर आली आहे की जमिनीवर राहणार्या सस्तन प्राण्यांपेक्षा पाण्यात राहणार्या सस्तन पाण्यांचा आकार तुलनेने जास्त असतो. उष्णतेची कमतरता आणि चयापचय ही दोन महत्वाची कारणे आकार निश्चित करण्यासाठी असतात. चयापचय ही प्रक्रिया पाण्यांच्या अन्न ग्रहणाशी आणि त्यांची ऊर्जा बाहेर पडते त्याच्या क्षमतेशी संबंधित आहे.
पाण्यांना चालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. या क्रियेतूनच त्यांची क्षमता दिसून येते, ते काय करु शकतात किंवा काय करु शकत नाहीत किंवा त्यांचा आकार कसा आहे हे यावरुन ठरतं. थोडक्यात त्यांच्या चयापचय क्षमतेवर ही गोष्ट अवलंबून असते. समुद्रातील वातावरण खूप थंड असतं आणि व्हेल गरम रक्ताचे सस्तन जीव असल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर टाकता यावी, ज्यामुळे त्यांच्या भोवतालचं पाणी गरम राहावं यासाठी त्यांचा आकार मोठा असतो.
व्हेलचा आहारही विशाल असतो. जर व्हेल लहान असती तर तिच्यातून ऊर्जा इतक्या लवकर बाहेर पडली असती की त्यांना अन्न योग्य प्रमाणात मिळालं नसतं, म्हणूनच त्यांचा आकार मोठा असतो. त्यांचा आहार जास्त असल्यामुळे त्यांना चयापचय म्हणजेच अन्न ग्रहण केल्यावर ऊर्जा बदलण्याची प्रक्रिया मोठी असल्याने अधिक वेगवान होते. हे आहे व्हेलचं अवाढव्य असण्याचं वैज्ञानिक कारण!
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.