केंद्रीय आयुष मंत्रालय अंतर्गत जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त 10 एप्रिल 2023 रोजी, नवी दिल्ली येथे वैज्ञानिक संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
( हेही वाचा : इगतपुरीमध्ये सिलेंडर स्फोटामुळे घराला आग, लाखोंचे नुकसान )
होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. क्रिस्तियन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनेमन यांच्या जयंतीनिमित्त जागतिक होमिओपॅथी दिन साजरा केला जातो. डॉ. क्रिस्तियन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनेमन यांच्या 268 व्या जयंतीनिमित्त आयोजित यंदाच्या वैज्ञानिक संमेलनाची संकल्पना ‘होमियोपरिवार – सर्वजन स्वास्थ्य, एक आरोग्य, एक कुटुंब’ अशी आहे.
संमेलनाला येणाऱ्या प्रतिनिधींमध्ये होमिओपॅथिक संशोधक, आंतरविद्याशाखेतील शास्त्रज्ञ, अभ्यासक, विद्यार्थी, उद्योजक तसेच विविध होमिओपॅथिक संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. यावेळी एक माहितीपट, पोर्टल आणि सीसीआरएचच्या 8 पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.
संमेलनादरम्यान, धोरणात्मक बाबी, होमिओपॅथीमधील प्रगती, संशोधन संबंधी पुरावे आणि होमिओपॅथीमधील क्लिनिकल अनुभव यावर विविध सत्रे आयोजित केली जातील. विज्ञान भवनातील या प्रारंभिक कार्यक्रमानंतर भारतातील पाच ठिकाणी विभागीय जागतिक होमिओपॅथी दिन कार्यक्रम होतील.
Join Our WhatsApp Community