सचिनला वाढदिवसानिमित्ताने ज्येष्ठ अंपायर माधव गोठोस्कर यांच्या अनोख्या शुभेच्छा 

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ अंपायर माधव गोठोस्कर यांनी सचिनला शुभेच्छा देतांना सोबत ३० वर्षांपूर्वीचा फोटो प्रसिद्ध केला आहे.

328

प्रतिस्पर्ध्यांना खेळवत ठेवणारा आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोमवारी, २४ एप्रिल रोजी वयाची ५० वर्षे पूर्ण करत आहे. आयुष्याची ‘अर्धशतकी खेळी’ पूर्ण करतानाही क्रिकेट हाच त्यांचा श्वास राहिला आहे. सचिनवर दोन दिवसांपासूनच जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात एक अनोखी शुभेच्छा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ अंपायर माधव गोठोस्कर यांनी दिली आहे.

माधव गोठोस्कर यांनी सचिनला शुभेच्छा देतांना सोबत ३० वर्षांपूर्वीचा फोटो प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये माधव गोठोस्कर यांच्यासोबत स्वतः सचिन तेंडुलकर दिसत आहे. या फोटोसोबत गोठोस्कर यांनी सुंदर शब्दांत सचिन तेंडुलकरला शुभेच्छा दिल्या. गोठोस्कर म्हणतात, सचिन तुला सुवर्ण वाढ दिवसानिमित्ताने दीर्घायुष्य लाभो, ३० वर्षांपूर्वीचा आपल्या दोघांच्या फोटोसह संस्मरणीय आठवणीने तुला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आशीर्वाद! सचिन, २५ एप्रिल १९९३ रोजी नवी मुंबईमध्ये एका सामन्यात तू सहभाग घेतला होतास, त्यावेळीच्या आठवणी आजही मी वयाच्या ९५ वर्षी जपून ठेवल्या आहेत, असेही माधव गोठोस्कर हे सचिन तेंडुलकर याला शुभेच्छा देताना म्हणाले.

(हेही वाचा वाढते तापमान महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा)

वाढ दिवसाच्या निमित्ताने सचिन तेंडुलकरने काही निवडक पत्रकारांशी चर्चा केली, त्यामध्ये बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाला, कौतुकाची थाप कामगिरी अधिक उंचावते यावर माझा विश्वास आहे. माध्यमांनी माझे कौतुक केले, त्यामुळेच मला कठोर परिश्रम करण्यासाठी बळ मिळाले. मी काही कायमच यशस्वी ठरलो नाही. मला अपयशालाही सामोरे जावे लागले. मात्र क्रिकेट या सुंदर खेळाने मला माझ्या पायावर उभे राहण्याची ताकद दिली. अपयशानंतर वाटचाल करीत राहणे आवश्यक असते. त्यासाठी आवश्यक असणारे इंधन तुम्ही मला दिलेत. तुमच्या मदतीविना मी हा टप्पा पार केला नसता, असे सचिन म्हणाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.