गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील हवामानात सतत बदल होत आहेत. या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचे संकट अजूनही संपलेले नाही कारण हवामान विभागाकडून येत्या आठवड्यात राज्यात कशी परिस्थिती असेल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील पाच दिवस महत्त्वाचे असून अनेक ठिकाणी पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
( हेही वाचा : महापालिकेचे विद्यार्थी शाळांच्या गच्चीवर करणार शेती, पिकवलेली भाजी वापरणार मध्यान्ह भोजनात )
विदर्भासह मराठवाड्यात गारपीटीची शक्यता
पुढील पाच दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरूवात आणि शुक्रवारी म्हणजेच २६ आणि २७ एप्रिल रोजी मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाड्याप्रमाणे विदर्भातही गारपीट होण्याची शक्यता आहे.
शेती-पिकांचे नुकसान
दरम्यान पुढील पाच दिवस राज्यात कोणत्याही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुन्हा एकदा हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. आंबा, द्राक्ष, केळी, संत्रा या फळबागांसह गहू, हरभरा, मका, मोहरी, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Join Our WhatsApp Community