IPL 2023: श्रेयस अय्यरच्या जागी कोलकाता संघात आला ‘हा’ नवा खेळाडू

134
Sanjay raut reaction on Sharad Pawar statement
संजय राऊत पत्रकार परिषद

संपूर्ण देशभरातील क्रिकेटचे चाहते ज्या सामन्यांची वर्षभर आतुरतेने वाट पाहतात, त्या आयपीएल २०२३ च्या रंगतदार सामन्यांचा ३१ मार्चला श्रीगणेशा झाला. पहिल्या दिवशी चेन्नई सुपर किंग्स हे गुजरात टायटन्सच्या विरोधात मैदानात उतरले होते. अखेर ५ विकेट्स घेत गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सवर मात केली. दरम्यान आरसीबी विरूद्ध केकेआर हा बहुप्रतीक्षीत सामना २६ एप्रिल २०२३ला कोलकत्त्याच्या इडन गार्डनमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यातील यश निश्चित करण्यासाठी केकेआरने साऊथ आफ्रिकेच्या खेळाडूला एका विशेष विकत घेतले आहे.

कोलकाताने ‘या’ खेळाडूला दुप्पट किमतीला का विकत घेतले?

मागच्या वर्षी झालेल्या लिलावात केकेआरने छत्तीस वर्षीय शाकिब अल हसनला दीड कोटीला विकत घेते. मात्र काही अज्ञात कारणांमुळे हा बांग्लादेशी खेळाडू यावर्षी स्पर्धेचा भाग होऊ शकत नाही. तर श्रेयस अय्यर शारीरिक दुखापतीमुळे स्पर्धेत उतरू शकत नाही. म्हणून त्याच्या जागेवर इंग्लंडरसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत असणाऱ्या रॉयला संघात घेण्यात आले आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२३ मध्ये जेसन रॉयला २.८ कोटी रुपयांना विकत घेतले. २३ डिसेंबर २०२२ ला झालेल्या लिलावात त्याची किंमत १.५ कोटी होती. मात्र तरीही तो अखेरपर्यंत अन-सोल्ड राहिला होता.

आरसीबीकडून ‘हे’ खेळाडू मैदानात उतरणार

फाफ डू प्लेसिस (कर्णधार),
विराट कोहली,
मायकेल ब्रेसवेल,
ग्लेन मॅक्सवेल,
डीजे विली,
अनुज रावत,
दिनेश कार्तिक,
आकाश दीप,
मोहम्मद सिराज,
हर्षल पटेल,
कर्ण शर्मा

कोलकाता ‘हे’ खेळाडू मैदानात उतरणार

नितीश राणा (कर्णधार),
रिंकू सिंह,
वॉरियर,
जेसन रॉय,
आदि रसेल,
सुनिल नारायण,
रहमानउल्ला गुरबाज,
शार्दुल ठाकूर,
टीम साऊदी,
वरुण चक्रवर्ती,
उमेश यादव

(हेही वाचा – फुकटात IPL दाखवल्यामुळे जिओला असा झाला फायदा!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.