मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आयोध्येत दाखल; मोठी रॅली

175

आयोध्येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार, ९ एप्रिल रोजी आयोध्येत दाखल झाले. पंचशील हॅाटेलवरून ते आयोध्येत दाखल झाले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. प्रचंड गर्दी त्यावेळी आहे.

ओपन जीपवरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थितांना अभिवादन करतांना दिसत होते. उत्तर प्रदेशच्या सरकारने या दोन्ही नेत्यांचे जंगी स्वागत केले. जय श्रीराम या घोषणा देत कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले. मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे प्रथमच आयोध्येला आले.

(हेही वाचा उत्तर प्रदेशात होणार ‘महाराष्ट्र भवन’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी करणार घोषणा!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.