पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरे, करोडो रामभक्तांचे स्वप्न पूर्ण केले – मुख्यमंत्री शिंदे

125

मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. माझे जे स्वागत झाले त्याचे मी आभार मानत आहे. बाळासाहेब ठाकरे, करोडो रामभक्तांचे स्वप्न होते, राम मंदिराचे निर्माण व्हावे. मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे सर्व खोटे ठरविले. मोदींनी त्यांच्याच काळात मंदिराचे काम सुरु केले आहे. तारीखही सांगितली आहे. जे विचारत होते त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आयोध्येत श्रीरामाची महाआरती केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हनुमान गढी येथे आले आणि त्यांनी तिथे हनुमानाचे दर्शन घेतले. त्यावेळी भाजपचे खासदार बृजभुषण सिंग उपस्थित होते. लखनऊ ते अयोध्यात पूर्ण परिसर भगवामय झाला आहे. राममय झाला आहे. सर्व रामभक्त अयोध्येत आले आहेत. रवी राणा इथली माती घेऊन जाणार आहेत. तिथे ११४ फुटी हनुमानाची मूर्ती उभारली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

(हेही वाचा cm eknath shinde ayodhya visit : राज्य सुजलाम सुफलाम होण्याचे श्रीरामाला साकडे घातले – मुख्यमंत्री शिंदे)

लखनऊ ते अयोध्यात पूर्ण परिसर भगवामय झाला आहे. राममय झाला आहे. सर्व रामभक्त अयोध्येत आले आहेत. रवी राणा इथली माती घेऊन जाणार आहेत. तिथे ११४ फुटी हणुमानाची मूर्ती उभारली जाणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. माझे जे स्वागत झाले त्याचे मी आभार मानत आहे. बाळासाहेब ठाकरे, करोडो रामभक्तांचे स्वप्न होते, राम मंदिराचे निर्माण व्हावे. मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे सर्व खोटे ठरविले. मोदींनी त्यांच्याच काळात मंदिराचे काम सुरु केले आहे. तारीखही सांगितली आहे. जे विचारत होते त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.