पुण्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली. कोथरूड, कर्वेरोड, स्वारगेट, डेक्कन परिसरात पाऊस जोरदार पडण्यास सुरूवात झाली. या अवकाळी पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाली.
पुण्यात रविवारी, ९ एप्रिल रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात यलो अलर्ट हवामान खात्याने दिला होता. यलो अलर्ट असल्याने विजांच्या कडकडाटासह शहरात हलक्या पावसाची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. तर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस असतानाही पुणे शहरातील तापमान वाढल्याने वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचेही पाहायला मिळाले होते. पुणे शहरात आणि जिल्ह्यांत 7, 8, 9 तारखेला विजांच्या कडकडासह शहरात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली होती. या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पुण्यात कोसळल्याने पुणेकरांची दाणादाण उडाली आहे.
(हेही वाचा शरद पवारांनंतर आता अजित पवारांकडून गौतम अदाणींचे समर्थन)
Join Our WhatsApp Community