राज्यात अस्मानी संकट! राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी, मदतीपासून वंचित राहू देणार नाही; कृषीमंत्र्यांचे आश्वासन

82

गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस व गारपीटीने राज्यातील २ हजार पेक्षा जास्त गावांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. यामुळे तातडीने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील पाहणी करून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज बीड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करा तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा व मदतीपासून वंचित राहणार नाही, याची गांभीर्याने दक्षता घ्या, असे निर्देश त्यांनी शासकीय यंत्रणेस त्यांनी दिले.

( हेही वाचा : कोरोनाचे संकट! ‘या’ राज्यांमध्ये मास्कसक्ती, २ दिवस मॉकड्रिल)

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी

राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा होत असून मदतीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी बीड जिल्ह्यातील कोळवाडी, धनगर वाडी, पिंपरनई , लिंबागणेश येथे गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. ते म्हणाले, राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मराठवाड्याबरोबरच विदर्भातील जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा करण्यात येणार असून पश्चिम महाराष्ट्रातील नुकसान पाहणीसाठी कृषी आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत असे कृषीमंत्र्यांनी सत्तारांना सांगितले.

पावसाच्या नैसर्गिक संकटामुळे शेतातील पीक मातीमोल झाले असून गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे घरांचे पत्रे उडून नुकसान झाले आहे, असे पिंपर्वणी गावातील महिला शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांना सांगितले. या अस्मानी संकटामुळे शेतकरी हतबल झाला असला तरी राज्य शासन मदतीपासून नुकसान झालेल्या एका देखील शेतकऱ्याला वंचित राहू देणार नाही असा त्यांनी विश्वास दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.