राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अशात महापालिका निवडणुका कधी होणार, याच्यावर भाष्य राज्याचे मंत्री, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले असून यंदाच महापालिका निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत आहे. तसेच या निवडणुका कोणत्या महिन्यात होणार आहेत?, याचे देखील उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिले.
सोमवारी प्रसार माध्यमांसोबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत आज सुनावणी आहे. पण मला अजूनही वाटते की, या निवडणुका ऑक्टोबरमध्येच होतील. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका यंदा ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचे स्पष्ट संकेत चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून मिळत आहे.
पुण्यातील लोकसभा निवडणुकीबाबत काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
आज गिरीश बापट साहेबांना जाऊन १३ दिवस झालेत. त्यामुळे कोणाला उमेदवारी देणार? कोण येणार? हे आता बोलणे असंवेदनशील असेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ५ जणांची नावे सध्या चर्चेत आहेत. त्यामध्ये, पहिले नाव हे बापट यांच्या कुटुंबातील असून त्यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांचे आहे. तर, दुसरी पसंती ही माजी खासदार संजय काकडे यांनाही आहे. तसेच माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचेही नाव चर्चेत आहे. त्यासोबतच, पुणे भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांचेही नाव पुढे आले आहे. तर, विधानसभेला तिकीट नाकारेल्या मेधा कुलकर्णी यांचेही नाव येथील उमेदवारीसाठी चर्चेत आहेत.
(हेही वाचा – आसामचे मुख्यमंत्री दाखल करणार राहुल गांधींविरोधात याचिका)
Join Our WhatsApp Community